BreakingNews ! भाजपाच्या 10 खासदारांचा तडकाफडकी राजीनामा; 3 केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश
पाच राज्यांमधील विधासभा निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं. मात्र अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी अनेक खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामागील कारण स्पष्ट करण्यात आळेलं नसलं तरी भारतीय जनता पार्टीच्या ज्या खासदारांनी विधानसभेची निवडणूक जिंकली आहे त्यांचा समावेश आहे. एकूण 10 खासदारांनी राजीनामा दिला आहे.
पक्षाने घेतला निर्णय
छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंर भारतीय जनता पार्टीने बुधवारी मोठं पाऊल उचललं. या निवडणुकींमध्ये जे खासदार आमदारकीची निवडणूक जिंकले आहेत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. भाजपाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सरकार स्थापन केली आहे. तेलंगणमध्ये भाजपाने 8 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाने 4 राज्यांमध्ये सध्या खासदार असलेल्या 21 खासादारांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं होतं. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी 7-7 खासदारांनी निवडणूक लढवली. छत्तीसगडमध्ये 4 आणि तेलंगणमध्ये एकूण 3 खासदारांना तिकीट देण्यात आलं होतं.
वरिष्ठांची भेट अन् राजीनामा
आज भाजपाच्या वरिष्ठांनी विधानसभा निवडणूक जिंकलेल्या खासदारांची भेट घेतली. या भेटीनंतर सर्व खासदारांनी राजीनामा दिला. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन भाजपाच्या या खासदारांनी आपले राजीनामे सादर केले. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेच या खासदारांच्या खासदारकीसंदर्भात प्रश्न विचारले जात होते. अखेर भाजपाने फार वेळ न घेता या खासदारांना पुन्हा त्यांच्या गृहराज्यामध्ये पाठवल्याने त्याच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाते का याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
राजस्थानमधून कोणत्या खासदारांनी दिला राजीनामा?
-राज्यवर्धन सिंह राठोड
-दीया कुमारी
- किरोडी लाल मीना (राज्यसभा सदस्य)
मध्य प्रदेशमधील खासदार ज्यांनी राजीनामा दिला
- नरेंद्र तोमर- प्रह्लाद पटेल- राकेश सिंह- रीति पाठक- उदय प्रताप सिंह
छत्तीसगडमधील खासदार ज्यांनी राजीनामा दिले
- गोमती साह
- अरुण साहू
मोदींच्या मंत्रीमंडळातील 3 मंत्र्यांचाही समावेश
राजीनामा दिलेल्या खासदारांपैकी प्रल्हाद पटेल आणि नरेंद्र तोमर हे केंद्रीय मंत्री आहेत. छत्तीसगढमधून खासदार असलेल्या केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे मोदींच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील 3 मंत्री कमी होणार आहे. याशिवाय राजस्थानचे खासदार बाबा बालकनाथही राजीनामा देणार आहेत. सध्या 10 जणांनी राजीनामे दिले असले तरी अजून 2 खासदार राजीनामा देतील असं सांगितलं जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.