Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! 'मम्मी-पप्पा माफ करा' म्हणत विद्यार्थ्याची आत्महत्या

 Breaking News!   'मम्मी-पप्पा माफ करा' म्हणत विद्यार्थ्याची आत्महत्या


कायगाव : मम्मी-पप्पा माफ करा असे वहीवर लिहीत एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी (ता.२९) सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामगाव (ता.गंगापूर) येथील घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओमकार दत्तात्रेय पाठे (वय १४) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. जामगाव येथील एका खासगी शाळेच्या इयत्ता ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या ओमकारने २९ डिसेंबर रोजी स्वतःच्या घरात ४ ते ७ वाजेदरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने वहीवर लिहिले की, धोका म्हणून मी चाललो. मम्मी पप्पा मला माफ करा. मी शेवटपर्यंत तुम्हाला साथ देवू शकलो. पण तुम्ही टेंशन नका घेऊ मी कायम तुमच्या सोबत राहीन, असे मजकूर लिहून घरातील पंख्याला दोरीने गळफास घेतला.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ओमकार यास खाली उतरवून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी साजिद शेख यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. ओमकार याने आत्महत्या का केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शनिवारी (ता.३०) रोजी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून त्यानंतर जामगाव येथे अंत्यविधी करण्यात आला.

ओमकार एकुलता एक मुलगा

या विद्यार्थ्याने गळफास घेतला. त्यावेळी घरी कुणीही नव्हते. तो आई, वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शकील शेख हे करीत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.