Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाला लुटणाऱ्यास अटक एक लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाला लुटणाऱ्यास अटक एक लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

सांगली :  मिरज तालुक्यातील आरग येथे पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाला लुटणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

अबुतालीफ मूसा इराणी (वय 28, रा. किर्लोस्करवाडी, ता. पलूस) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 12 डिसेंबर रोजी आरग येथील रेल्वे स्टेशन रोडवर अण्णासो गायकवाड यांना पोलिस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील दागीने लुटले होते. यातील चोरट्याना पकडण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक निरीक्षक शिंदे यांनी तयार केले होते.

पथकातील सागर लवटे यांना कुपवाड येथे एक तरुण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने आरग येथे एका वृद्धाला लुटल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीचे दागिने, रोकड जप्त करण्यात आली. त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, विक्रम खोत, संदीप नलवडे, उदय माळी, अमर नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.