Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अहमदनगरच्या सोन-साखळी चोरट्यास अटक चार लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

अहमदनगरच्या सोन-साखळी चोरट्यास अटक चार लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

सांगली : विटा शहरासह तासगाव येथे सोन-साखळी चोरणाऱ्यास विटा पोलिसांनी अहमदनगर येथून अटक केली. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून चोरीचे चार लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

संजय रामू माने (वय ३९, रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. १७ नोव्हेंबर रोजी माहुली येथील बसस्थानक परिसरात अज्ञाताने मनोज जरांगे यांच्या मराठा आऱक्षणाच्या रॅलीवेळी लालासाहेब माने यांची सोन-साखळी लंपास केली होती. त्याबाबत माने यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील चोरट्यांचा विटा पोलिस शोध घेत होते. 

या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेने याचा तपास सुरू केला. त्यावेळी हा गुन्हा पाथर्डी येथील संजय माने याने केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानुसार पथकाने पाथर्डी येथे जाऊन संजय माने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय तासगाव तालुक्यातही एक गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे चार लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करून त्याला अटक करण्यात आली. विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, अजय पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.