Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर मोठी कारवाई

पुण्यात तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर मोठी कारवाई

विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे आता बदलतंय. पुणे सध्या शिक्षणाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठीच चर्चेत आहे. गुन्हेगारीचं प्रमाणही पुण्यात वाढत आहे. अशात आता पुणे शहरात रात्री १.३० वाजेनंतर देखील नाईट पार्टी सुरु असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्सवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. हॉटेल आणि पब्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मागील आठ दिवसात पुण्यातील 10 हॉटेल्स आणि पबवर ही कारवाई करण्यात आली आहे.


कोणत्या हॉटेल्सवर कारवाई?

प्लंज, कोरेगाव पार्क

लोकल गॅस्ट्रो बार

एलरो

यूनिकॉर्न

आर्यन बार, बालेवाडी

नारंग वेंचर

हॉटेल मेट्रो

लेमन ग्रास, विमाननगर

बॉलर

हॉटेल काकाज

पुण्यात मध्यरात्री सुरू असलेल्या हॉटेल्सवर कुणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पुण्यातील नळ स्टॉप चौकात रात्री १ ते सकाळी ५ पर्यंत फूड स्टॉल सर्रास सुरू आहेत. कोथरूड पोलीस ठाणे, डेक्कन पोलीस ठाणे आणि अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे हॉटेल्स सुरू आहेत. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल आणि दुकानांवर पोलिसांचेही दुर्लक्ष आहे.


पुणे महापालिका तसेच कोणत्या ही यंत्रणेकडून रात्री १ नंतर कुठल्या ही आस्थापना सुरू ठेवायला परवानगी नाही. या चौकात मध्यरात्री सुरू असलेल्या हॉटेल्सवर पुणे पोलिस कारवाई करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.