Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जनावरे चोरणारी सहा जणांची टोळी अटकेतपावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई

जनावरे चोरणारी सहा जणांची टोळी अटकेतपावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई


सांगली : मिरज तालुक्यातील बेडग, म्हैसाळ, विजयनगर, नरवाड आदी परिसरातून जनावरे चोरणाऱ्या सहाजणांच्या टोळीला अटक करण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या चार गाई, गुन्ह्यात वापरलेले वाहन असा पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी दिली. 

प्रतीक प्रकाश कोळी (वय २१, रा. बेडग), राकेश आण्णासो शिंदे (वय २४, रा. म्हैसाळ, मूळ रा. आरग), आकाश ऊर्फ बापू मारूती मासाळ (वय २३, रा. बेडग), प्रकाश ऊर्फ बापान्ना मायाप्पा मासाळ (वय २४, रा. बेडग), किशोर ऊर्फ अण्णा भीमा शेळके (वय २१, रा. बेडग), राकेश प्रकाश आवळे (वय २१, रा. म्हैसाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बेडग, म्हैसाळ, विजयनगर, नरवाड आदी गावांमधून जनावरे चोरीला गेलेल्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर उपअधीक्षक गिल्डा यांनी मिरज ग्रामीण पोलिसांना चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.  

मिरज ग्रामीणचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना राकेश आवळे, प्रतीक कोळी यांनी गाईची चोरी करून प्रसाद बिरंजे याला विकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने आवळे, कोळी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने बेडग, म्हैसाळ, नरवाड, विजयनगर परिसरातून गाई तसेच अन्य जनावरे चोरून त्यातील काही विक्री केल्याची तर काही ओळखीच्या लोकांना दिल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली. शिवाय त्यांनी चोरलेल्या चार गाईही जप्त करण्यात आल्या. तसेच गुन्ह्यात वापरलेले छोटा हत्ती (एमएच १० सीआर ०५८२) हे वाहन असा पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, मिरज ग्रामीणचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रणजित तिप्पे, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, सचिन मोरे, प्रकाश साळुंखे, अमोल ढोले, महेश निकम, सुनील देशमुख, सुनंदा लोहार, कॅप्टन गुंडवाडे, अजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.