Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पृथ्वीराज पाटील यांच्यावाढदिनी विविध उपक्रम



पृथ्वीराज पाटील यांच्या
वाढदिनी विविध उपक्रम

सांगली दि.३० : सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा ५८ वा वाढदिवस रविवारी, दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा होणार आहे. पृथ्वीराज पाटील फौंडेशन व काँग्रेस कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन विविध उपक्रमांची जय्यत तयारी केली आहे. दि. ३१ डिसेंबर रोजी पृथ्वीराज बाबा दिवसभर त्यांच्या वसंत कॉलनीतील निवासस्थानी शुभेच्छा स्विकारतील, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम यांनी दिली आहे.
 
पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने सकाळी ७ वाजता राजवाडा चौक ते श्री गणपती मंदीर दरम्यान प्लॅगॉथॉन म्हणजे जॉगिंग करत कचरा बॅगेत भरुन बॅग जमा करणे हा ‘स्वच्छ सांगली, हेल्दी सांगली’ अंतर्गत उपक्रम होईल. महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या हस्ते प्रारंभ होईल. सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबीरे होतील. ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे व आधार काठी वाटप तसेच सांगली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षासाठी कायम योगदान दिलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा काँग्रेस कमिटीतर्फे विविध प्रभागात सत्कार केला जाईल. बिसूरमध्ये  पृथ्वीराज पाटील फौंडेशनतर्फे ६० किलो वजन गटाच्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सांगलीतील गव्हर्न्मेंट कॉलनी, स्फूर्ती चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राममंदिर व कॉलेज कॉर्नर येथे ‘दारु नको - दूध प्या’ कार्यक्रम होईल. सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील गावात डास प्रतिबंधक औषध फवारणी होईळ. रक्तदान शिबीर आणि गरजूंना भोजन वाटप करण्यात येईल. सातत्याने सांगलीकरांच्या हितासाठी झटणारे पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस अशा विविध समाजोपयोगी रचनात्मक उपक्रमातून साजरा करुन वाढदिवसाला सामाजिक बांधिलकी व मानवता मूल्यांची जोड दिल्याने सांगलीकरांनी या संकल्पनेचे जोरदार स्वागत केल्याचे पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम यांनी सांगितले.
बहुजन समाजातील गोरगरीब मुलांना वाटण्यासाठी दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी वाढदिवसानिमित्त वह्या देऊन शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन श्री. बिपीन कदम यांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.