Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उटगीजवळ गुटखा, सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक ७० हजारांचा मुद्देमाल जप्त, उमदी पोलिसांची कारवाई

उटगीजवळ गुटखा, सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक ७० हजारांचा मुद्देमाल जप्त, उमदी पोलिसांची कारवाई


सांगली : जत तालुक्यातील उटगी-जाडरबोबलाद रस्त्यावर गुटखा तसेच सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दुचाकीसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली. 

धनंजय तवणाप्पा घोंगडे (वय ५३, रा. येळवी, ता. जत), अहमद सिराज मुलाणी (वय ४२, रा. खैराव गिरगाव, ता. जत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू यांची वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहायक निरीक्षक श्री. शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक उटगी परिसरात गस्त घालत होते.

उटगी-जाडरबोबलाद रस्त्यावर दोघेजण दुचाकीवरून संशयास्पदरित्या जाताना पथकाला आढळले. त्यानंतर पथकाने त्यांना थांबवून त्यांच्याकडील पिशव्यांची तपासणी केली. त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू आढळून आली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दुचाकी, गुटख्याची २६० पाकिटे, सुगंधित तंबाखूची ५२ पाकिटे असा ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 

उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिरीष शिंदे, नामदेव काळेल, प्रशांत कोळी, सोपान भंडे, नितीन खोंडे, सुदर्शन खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.