Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर : मद्य पार्टीवर छापा..

कोल्हापूर : मद्य पार्टीवर छापा..

कोल्हापूर: कर्णकर्कश आवाजातील गाणी... मद्याचा साठा... शंभरावर पुरुष आणि महिलांचा चाललेला जल्लोष अशा उजळाईवाडीतील विनापरवाना पार्टीवर पोलिसांनी रविवारी रात्री छापा टाकला. याप्रकरणी पार्टी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मद्यसाठा, रोख रक्कम व डीजे असा सुमारे 2 लाख 82 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ख्रिसमस व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उजळाईवाडीत एका कॅफेमध्ये या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना समजली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथक पाठवले. पार्टीत 60 पुरुष आणि 40 हून अधिक महिलांचा पार्टीमध्ये सहभाग दिसून आला.


याप्रकरणी कॅफे मायाचा मालक दयानंद जयंत साळोखे (रा. उजळाईवाडी), पार्टी आयोजक मयुरा राजकुमार चुटानी (रा. नागाळा पार्क), डीजे ऑपरेटर नागेश लहू खरात (रा. फुलेवाडी), मालक दिगंबर रघुनाथ सुतार (रा. फुलेवाडी) याच्यासह कामगार गजेंद्र रामदास शेठ व गौरव गणेश शेवडे (रा. शाहूपुरी) अशांविरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी 53,725 रुपये किमतीचे विदेशी मद्य, 88, 740 रोख रक्कम व 1,40,000 रुपये किमतीची डीजे सिस्टीम असा एकूण 2,82,465 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नववर्ष स्वागताच्या नावाखाली जिल्ह्यात कोठेही विनापरवाना, बेकायदेशीर व वेळेचे उल्लंघन करून पार्थ्यांचे आयोजन केल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.