Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतक-यांना सरसकट भरघोस मदत करावी - विशाल पाटील

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतक-यांना सरसकट भरघोस मदत करावी - विशाल पाटील


 सांगली : वातावरणातील बदलामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेचे, शाळूचे व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.  त्या सर्व शेतक-यांना शासनाने तात्काळ सरसकट भरघोस मदत करावी आणि शेतक-यांना अनेक अडचणीतून बाहेर काढावे असे विधान द्राक्षबाग पाहणी दौ-यामध्ये विशाल पाटील यांनी केले.

 सध्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबाग पिकांचे व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मिरज तालुक्यातील पूर्व भागातील टाकळी, बेळंकी, गुंडेवाडी, मालगाव येथील शेतक-यांच्या बांधावरती जाऊन द्राक्षबाग नुकसानीची पाहणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केली. संपूर्ण वर्षभर पिकाला अत्यंत चांगल्या प्रकारे जपणूक करून अगदी शेवटच्या टप्प्यात अवकाळी पावसाच्या दणक्यामुळे बेळंकीतील द्राक्षबागायतदार शेतकरी दिलीप गायकवाड यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांच्या बागेचे प्रचंड नुकसान झाले विक्रीसाठी तयार झालेला द्राक्ष पावसाच्या दणक्यामुळे कुजून गेलेले आहेत. अवकाळी पाऊस पीक विमा कंपन्यांची बेदखलपणा, खाजगी सावकारी, शासनाचे शेतक-यांना कर्ज वाटपाचे धोरण तसेच दररोज बदलणारी ऑनलाइन प्रणाली यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हतबल झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतक-यांना जगणे मुश्किल झाले आहे.


यावेळी मिरज तालुका काँग्रेस अध्यक्ष आण्णासाहेब कोरे, पांडुरंग कवलापुरे, संताजी गायकवाड, राजाराम गायकवाड, रवींद्र गायकवाड, अशोक बेंदरकर, अजित कोडग, राजेंद्र चौगुले, काकासो माने, बाळासो कोरे, सुरेश मेटकरी, गंगाधर पाटील, सुखदेव कटारे, तुकाराम पाटील, रमेश पाटील, आनंदराव पाटील, आनंदराव गडदे, श्रीमंत पांढरे, शिवाजी माळी, उद्धव सावंत, सिद्राम माळी, मोहन पवार, कपिल कबाडगे, अरुण माळी, अनिल माळी, तातोबा माळी, बाबासो पाटील, सागर पाटील, सचिन पाटील, अमोल पाटील, सुनील गुळवणे, पप्पू गुरव, आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.