Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वारणालीतील रुग्णालयाचा निधीवर्ग करण्यात दिरंगाई कशासाठी?सतेज पाटील ः विधान परिषदेत प्रश्‍न उपस्थित

वारणालीतील रुग्णालयाचा निधीवर्ग करण्यात दिरंगाई कशासाठी?सतेज पाटील ः विधान परिषदेत प्रश्‍न उपस्थित


सांगली, ता. २० ः सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या वारणाली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयास मंजूर निधी वर्ग करण्यास दिरंगाई का होत आहे, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. याबाबत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आमदार पाटील यांना विनंती केली होती.

महानगरपालिकेचे वारणाली मल्टीस्पेशालिटी रुग्णालय विविध अत्याधुनिक सोयी-सुविधांसह कार्यान्वित करण्यासाठी मंजूर निधी वर्ग करण्याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. आरोग्य सेवेशी संबंधित असणारा हा महत्वाचा प्रश्न असून यापूर्वीच मंजूर झालेला निधी वर्ग करण्यात येणे आवश्यक होते. हा निधी कधी वर्ग करण्यात येणार त्याची तारीख मंत्री उदय सामंत यांनी सांगावी, अशी विनंती केली. याबाबत उदय सामंत यांनी एकूण सहा कोटी मंजुर आहेत. हा सर्व निधी आठ दिवसांत वर्ग करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल, असे सांगितले.

सतेज पाटील यांनी सांगली महापालिकेच्या मालकीचे पहिले हॉस्पीटलकरीता हा प्रश्न मार्गी उपस्थित करून सांगलीच्या एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली. त्याबद्दल त्यांचे आभार पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले. या हॉस्पीटलचे निधी अभावी रखडलेले बांधकाम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.