Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जातवैधतेसाठी कागदपत्रांचे नवीन निकष काय वाचा


मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. शासनाने मराठा- कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्र पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी शिंदे समिती गठित केली असून दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाकडून काम सुरू आहे.
यातच आता जात वैधता प्रमाणपत्रासाठी शासनाकडून नवीन कागदपत्रांच्या निकषांचा समावेश करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी घेण्यात आलेल्या १२ नोंदीचा यात समावेश असल्याचे समजते.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागण्यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी आंदोलन केले. त्याची दखल घेतल शासनाने मराठा- कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्र पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्या. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. समितीने आपला अहवालही सरकारकडे सादर केला.

परंतु अद्याप हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाचेही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे शासनाने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणासाठी आवश्यक माहिती गोळा करण्यात येत आहे. जात प्रमाणपत्रासह वैधता प्रमाणपत्रासाठी शासनाकडून काही कागदपत्रांचे निकष निश्चित करण्यात आले आहे. यात आता आणखी काही नवीन निकषांचा समावेश करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २७ डिसेंबरला याबाबतची अधिसूचना काढली.

या निकषांचा झाला समावेश

महसुली अभिलेख नोंदी. खसरा पत्रक, पाहणी पत्रक, क-पत्रक, कूळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन १९५१, नमुना नं.०१ हक्क नोंदपत्रक, नमुना नं.०२ हक्क नोंदपत्रक व ७/१२ उतारा.

जन्म - मृत्यू रजिस्टर संबंधीचे अभिलेख. - गाव नमुना नं.१४.

शैक्षणिक अभिलेखे. प्रवेश निर्गम नोंदवही / जनरल रजिस्टर.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेखे. अनुज्ञप्ती नोंदवह्या, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना अभिलेख

कारागृह विभागाचे अभिलेखे. रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर, कच्चा कैद्यांची नोंदवही.

पोलिस विभागाकडील अभिलेखे. गाववारी, गोपनीय रजिस्टर सी-१, सी-२, क्राइम रजिस्टर, अटक पंचनामे व एफ. आय. आर. रजिस्टर.

सह जिल्हा निबंधक तथा मद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडील अभिलेखे. खरेदीखत नोंदणी रजिस्टर, डे युक, करारखत, साठेखत, इसार पावती, भाडे चिठ्ठी, ठोकेपत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधानपत्रक, मृत्युपत्रक, इच्छापत्रक, तडजोडपत्रक, इतर दस्त.

भूमी अभिलेख विभागाकडील अभिलेखे. पक्काबुक, शेतवारपत्रक, वसुली बाकी, ऊल्ला प्रतीबुक, रिव्हीजन प्रतीवृक, क्लासर रजिस्टर, हक्क नोंदणीपत्रक, नमुना नं.३३ (प्रतीकडील इसमवार यादी), नमुना नं.३४ ( खानेसुमारी तक्ता) व टिपण बुक;.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडील अभिलेखे. माजी सैनिकांच्या नोंदी.

जिल्हा वक्फ अधिकारी यांचे कार्यालयाकडील अभिलेखे, मुंतखब.

शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशीलाबाबतची अभिलेखे. मानीव दिनांकपूर्वीचे कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील अभिलेखे. वैध व अवैध प्रकरणांचा तपशील व कारणे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.