Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विवेक फणसाळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभाररश्मी शुक्ला यांना राज्याचे महासंचालकपद की मुंबईचे आयुक्तपद

विवेक फणसाळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभाररश्मी शुक्ला यांना राज्याचे महासंचालकपद की मुंबईचे आयुक्तपद

मुंबई :  महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ रविवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत देण्यात आला आहे. दरम्यान पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची राज्याच्या महासंचालकपदी नियुक्ती होणार की मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. 

वरीष्ठ आयपीएस अधिकारी रजनीश शेठ सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. शेठ यांनी रविवारी आपल्या पदाचा कार्यभार फणसाळकर यांच्याकडे सुपुर्द केला. दरम्यान याबाबतचे आदेश शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने काढण्यात आले आहेत. दरम्यान फसणाळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा कार्यभार पुढील आदेशापर्यंत देण्यात आला आहे. 

पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवतीर्य मानल्या जातात. २०१९ निवडणुकीवेळी काही राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर करण्यात आला होता. तसेच त्यांच्यावर दोन गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मात्र ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर शुक्ला यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले. त्यानंतर त्यांची केंद्र शासनाकडे नियुक्ती करण्यात आली होती. आता शुक्ला यांची राज्याच्या महासंचालकपदी नियुक्ती होणार की मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र श्रीमती शुक्ला मुंबई पोलिस आयुक्त पदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.