Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिस उपायुक्त (पश्चिम) राहुल राज यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, पोलिसांनी सोमवारी सत्यम मिश्रा, सुहेल आणि अस्लम यांना अटक केली आहे. 5 डिसेंबर रोजी चालत्या कारमध्ये एका 22 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी त्यांना अटक केल्याचे राज यांनी सांगितले. पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज यांनी सांगितले की, पीडितेवर किंग जॉर्ज मेडिकल विद्यापीठाच्या मानसोपचार विभागात उपचार सुरू होते. इथे ये-जा करत असताना पीडितेची विद्यापीठाबाहेर चहा विकणाऱ्या सत्यम मिश्रा याच्याशी ओळख झाली होती. घटनेच्या दिवशी मोबाईल चार्ज करण्यासाठी पीडितेने सत्यमची मदत मागितली होती. सत्यमने अँम्ब्युलन्समध्ये चार्जिंगची व्यवस्था असल्याचे सांगून पीडितेला अँब्युलन्सच्या दिशेने नेले होते. अँम्ब्युलन्समध्ये पीडितेने मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर या अँब्युलन्समध्ये रुग्ण आणण्यात आला होता. रुग्णाला घेऊन अँम्ब्युलन्स निघून गेली. हे लक्षात आल्यानंतर पीडितेने आणि सत्यमने अँम्ब्युलन्सचा पाठलाग सुरू केला.

 

आयटी कॉलेज चौकात त्यांनी अँम्ब्युलन्स गाठली देखील मात्र तिथे सत्यमचे दोन साथीदार सुहेल आणि अस्लम हे चारचाकी गाडी घेऊन पोहोचले. या तिघांनी पीडितेला गाडीत कोंबले आणि तिथून पळ काढला. आरोपींनी पीडितेला अंमली पदार्थांचे सेवन करायला लावले आणि जबरदस्ती दारू प्यायला लावली होती. पीडितेची शुद्ध हरपल्यानंतर सुहेल आणि अस्लम यांनी तिच्यावर बलात्कार केला. सत्यमने बलात्कार होत असताना व्हिडीओ चित्रीकरण केले होते. पीडिता शुद्धीवर आल्यानंतर सत्यमने तिला हे चित्रीकरण दाखवले होते. पीडितेने त्याला विनंती केली होती की हे चित्रीकरण डिलीट कर. मात्र त्याने तसे न करता पीडितेला धमकावण्यास सुरुवात केली होती.


आरोपींनी पीडितेला एका निर्जन स्थळी सोडून पळ काढला. सदर प्रकारामुळे ही तरुणी जबरदस्त घाबरली होती ज्यामुळे तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस तक्रार केली नाही. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी वजीरगंज पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.