Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आरएसएसचे मोहन भागवत यांना कुठलेही घटनात्मक पद नसताना झेडप्लस सिक्युरिटी कशासाठी; राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

आरएसएसचे मोहन भागवत यांना कुठलेही घटनात्मक पद नसताना झेडप्लस सिक्युरिटी कशासाठी; राज्य प्रवक्ते संतोष पाटील.


देशामध्ये ज्या वेळेला हिंदू मुस्लिम वादाच्या घटना घडवून जाळपोळ करून दंगली घडवल्या जातात.काही ठिकाणी बॉम्बस्फोट हल्ले होतात. काही ठिकाणी अति महत्त्वाच्या व्यक्तीला मारलं जातं. देशातील सर्व नागरिकांचे लक्ष एका घटने कडून दुसऱ्या घटनेकडे वळवण्यासाठी काही विशिष्ट घटना घडवल्या जातात, देशाच्या एका विशिष्ट समाजालाच आणि विशिष्ट संस्थेमधीलच लोकांना याचा फायदा होईल 

अशीच काही निर्मिती करणे,अशा वेळेला सर्वसामान्यांचे बोट हे ज्या संघटनेकडे जाते ती संघटना म्हणजे आरएसएस होय. याच आरएसएस संघटनेचे सर संघचालक माननीय मोहन भागवत हे आज सांगली दौऱ्यावर आले आहेत.सांगलीमध्ये प्रचंड पोलीस फौज फाटा व त्यांना असणारी झेड प्लस दर्जाची सिक्युरिटी पाहून हे काय आपल्या देशाचे राष्ट्रपती,पंतप्रधान, संरक्षण दलाचे अधिकारी आहेत का असेच नागरिकांना वाटत होते,सर्व सामान्याच्या मनामध्ये पडलेला प्रश्न हा आहे की आरएसएस सरसंघचालक माननीय मोहन भागवत हे काही घटनात्मक व्यक्ती नाही, मग तरीसुद्धा त्यांना झेड प्लस दर्जाची सिक्युरिटी का? दिली जाते हा सर्वसामान्याच्या व देश हिताच्या नागरिकांसाठी पडलेला प्रश्न आहे.  देशाच्या घटनात्मक पदावर बसलेले व्यक्ती पैशाचा गैरवापर करत आहेत हे दिसत आहे. या सगळ्यांची सिक्युरिटीचा पगार सर्वसामान्याच्या नागरिकांच्या करातून दिला जातो. म्हणजेच एकंदरीत देशाचे नुकसान होतेआणि त्या व्यक्तीच्या त्या संस्थेलाच फायदा होत असेल आणि देशासाठी फायदा होत नसेल तर त्यांना सिक्युरिटी कशासाठी हा सर्वसामान्यांचा मनामध्ये पडलेला प्रश्न आहे. हे सरकारने थांबवावे अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे माहिती दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.