Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वीस हजारांची लाच घेताना सहायक सरकारी वकिलास अटक सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

वीस हजारांची लाच घेताना सहायक सरकारी वकिलास अटक सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


तक्रारदाराविरोधात दाखल असलेल्या केसमध्ये तडजोड़ करून केस लवकर निकाली काढण्यासाठी वीस हजारांची लाच घेताना सहायक सरकारी वकिलास रंगेहात पकडण्यात आले. सोमवारी दुपारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याची माहिती पौलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

सोमनाथ काकासो माळी (वय ३६, रा. गणेश कॉलनी, सुभाषनगर, मिरज) असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. माळी हा सांगलीतील प्रथमवर्ग न्यायालयात सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत आहे. तक्रारदाराच्या विरोधात एक केस दाखले आहे. त्यामध्ये तडजोड करून केस लवकर निकाली काढण्यासाठी माळी याने त्यांच्याकडे २५ हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २० हजार रूपये देण्याचे ठरले. 

मात्र तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत शुक्रवारी माळी याच्याविरोधात सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. विभागाने याची पडताळणी केल्यानंतर माळी याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी विजयनगर येथील न्यायालयाबाहेर तक्रारदाराकडून वीस हजारांची लाच घेऊन दुचाकीवरून जाताना नेमीनाथनगर येथे माळी याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शासकीय, निमशासकीय लोकसेवकांनी लाच मागितल्यास 9821880737 या मोबाईल क्रमांकावर थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपअधीक्षक पाटील यांनी केले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, प्रितम चौगुले, धनंजय खाडे, अजित पाटील, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, ऋषिकेश बडणीकर, उमेश जाधव, सुदर्शन पाटील, सिमा माने, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, विना जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.