Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र शासनात नोकरीची मोठी संधी!, 'या' विभागात विविध रिक्त पदांसाठी होणार भरती

महाराष्ट्र शासनात नोकरीची मोठी संधी!, 'या' विभागात विविध रिक्त पदांसाठी होणार भरती

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत भरती केली जाणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून राज्यातील विविध विभागातील कार्यालयात भरती केली जाणार आहे. एकूण ३४५ रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील पुरवठा निरीक्षक गट क, उच्चतर लिपिक गट क ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, अर्ज करण्याकरिता दि. १३ डिसेंबर २०२३ पासून अर्जस्वीकृतीस सुरुवात होणार आहे. तर दि. ३१ डिसेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे.

पदाचे नाव

१) पुरवठा निरीक्षक (गट क)

२) उच्चतर लिपिक (गट क)

वयोमर्यादा

१८ ते ३८ वर्षे

नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, पदवीधर मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता १,००० रुपये परीक्षा शुल्क

राखीव वर्गाकरिता उमेदवारांकरिता ९०० रुपये परीक्षा शुल्क

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.