Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिव्हिल हॉस्पिटलचे डीन डॉ.ननंदकर यांना निलंबित करावे यासाठी हिवाळीअधिवेशनात विरोधी पक्ष नेत्यांना भेटणार - राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

सिव्हिल हॉस्पिटलचे डीन डॉ.ननंदकर यांना निलंबित करावे यासाठी हिवाळीअधिवेशनात विरोधी पक्ष नेत्यांना भेटणार - राज्य प्रवक्ते संतोष पाटील.


पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठे असणारे हॉस्पिटल म्हणजे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल होय. या हॉस्पिटलमध्ये दररोज एक हजार ते बाराशे पेशंट ओपीडी मध्ये नोंदणी करून या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतात. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात महागडे असणारी मशीन म्हणजे सिटीस्कॅन मशीन होय.या मशीनमध्ये शरीराच्या कुठल्या भागातील इजा झाली असेल किंवा गंभीर आजार या सिटीस्कॅन मशीन द्वारे निदान होत असते. 

खाजगी लॅब मध्ये स्कॅनिंग करण्यासाठी सहा ते आठ हजार रुपये एका रुग्णाकडून घेतात परंतु सिव्हिल हॉस्पिटल सांगली मध्ये मशीनच उपलब्ध नसल्यामुळे येथील डॉ.बाहेरील डॉक्टरांची कमिशन पोटी चिठ्ठी देतात एका रुग्णाचे स्कॅनिंग करण्यासाठी सात ते आठ हजार चार्ज आकारला जातो एका चिठ्ठी मागे दोन हजार कमिशन सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टरना मिळत असते अशा रोज किमान 50 पेशंटच्या चिठ्ठ्या बाहेर दिल्या जातात,परंतु या हॉस्पिटलमध्ये येणारे सर्रास पेशंट हे काबाडकष्ट,मजूर हातावरची पोटे,असणारे दररोज कामाला गेल्यानंतरच घरात पैसे आणणारे गरीब पेशंट असतात या विषयाची गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने आरोग्य व वैद्यकीय विभागाने सांगली सिविल हॉस्पिटलला ही मशीन खरेदी करण्यासाठी गेल्या वर्षी म्हणजेच 27 मार्च 2022 रोजी मशीन खरेदीसाठी निधी प्राप्त झाला. 


चार एप्रिल 2022 रोजी या मशीन घेण्यासाठी हापकिन्स या कंपनीला टेंडर देऊन निधी वर्ग केला परंतु आजपर्यंत एक वर्ष होऊन गेले तरी सुद्धा या ठिकाणी सिटीस्कॅ मशीन आले नाही.त्यामुळे हा निधी परत सरकारी दरबारी गेला आहे. याची सर्वशी जबाबदारी ह्या सांगली सिविल हॉस्पिटलचे अधिष्ठता डॉ.सुधीर ननंदकर यांची आहे यांच्यात बाहेरील डॉक्टरांचे कमिशन पोटी  हा निधी माघारी गेला आहे अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे म्हणून आम्ही नागपूर येथे चालू असलेले हिवाळी अधिवेशनामध्ये सांगली जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे नेते आ. डॉ. विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम साहेब व आ.विक्रम दादा सावंत यांना बरोबर घेऊन विरोधी पक्ष नेते मा.विजय वडेट्टीवार साहेब यांना भेटून याविषयी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून हा प्रश्न सोडवावा तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने झोपेचं सोंग घेतलेल्या ना जागे करण्यासाठी व डॉ. सुधीर ननंदकर यांना निलंबन करावे म्हणून नागपूर येथे जाऊन गंभीर झालेला प्रश्न सोडवण्यासाठी मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील व अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते माननीय अशोक मासाळे हे शिष्ट मंडळासहित लवकरच नागपूरला रवाना होणार आहे अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते मा. संतोष पाटील यांनी पत्रकारांना दिली. या वेळेला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माझी समन्वयक मा. सर्जेराव पाटील,अनमोल पाटील,सुशांत कदम,बाजीराव गस्ते अक्षय मासाळे व इतर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.