Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तेलंगणात काँग्रेसची आघाडी: डीके शिवकुमार; व्हिडिओ पहा

तेलंगणात काँग्रेसची आघाडी: डीके शिवकुमार; व्हिडिओ पहा

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 चे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. येथील 119 विधानसभा जागांवर काँग्रेस आघाडी घेताना दिसत आहे. तर सत्तेत असलेले मुख्यमंत्री केसीआ यांचा पक्ष बीआरएस पिछाडीवर जाताना दिसत आहेत. असं असताना मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षनेतृत्वाने याबाबत चर्चा केली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएम डीके शिवकुमार म्हणाले की, जर पक्षाला 70 हून अधिक जागा जिंकण्यात यश आले, तर मुख्यमंत्रीपदावरून पक्षातील अंतर्गत कलह समोर येऊ शकतो. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षातील काही नेते असमाधानी असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

ते पुढे म्हणाले की, जिथे काँग्रेस 65 पेक्षा कमी जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनतो, तिथे मुख्यमंत्री ठरवणे कठीण जाते. कारण हे आव्हान मुख्यमंत्री होण्याची आशा असलेल्या महत्त्वाकांक्षी नेत्यांनीच निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत हे सर्व नेते बीआरएसला (BRS) मदत करू शकतात.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.