Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात शटर बंद करुन दारुच्या दुकानात ग्राहकांना लुटलं !



पुणे : पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना ग्रामीण भागातही राजरोसपणे कोयता पाहायला मिळतोय. नांदेड फाटा या ठिकाणी असणाऱ्या दारूच्या दुकानात चक्क तीन जणांनी कुऱ्हाड दाखवत दुकान बंद करून दारू पिणाऱ्या ग्राहकाला मारहाण केली आहे.

जीवे मारण्याची धमकी देत ग्राहकांकडून रोख रक्कम आणि किमती ऐवज लुटला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यासंदर्भात हवेली पोलीस तपास करत आहेत.

रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. दारूच्या दुकानात नेहमीप्रमाणे ग्राहक दारू पित होते. अचानक तिघेजण आतमध्ये घुसले आणि त्यांनी दमदाटी करत कुऱ्हाडीचा धाक दाखवत ग्राहकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने हॉटेलमधील ट्रे उचलत त्याने ग्राहकांना डोक्यात आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आधी कोयता गँग आणि आता कुऱ्हाड गँग सक्रीय झालीय का? असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांना पडला आहे.

महिला पोलिसांसमोर कोयत्याने हल्ला
पुणे जिल्ह्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यासमोरच दोन गटांमध्ये कोयत्याने हल्ला झाल्याची घटना वडगावशेरी या परिसरात घडली. या कोयता हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलं झाला असून पुण्यात खरचं कायदा व्यवस्था उरली आहे का असा सवाल विचारला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील वडगावशेरी परिसरात रात्रीच्या सुमारास दोन गटात झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या वादातून कोयत्यानं हल्ला करण्यात आला. कोयता हल्ला होत असताना महिला पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होती. मात्र, पोलिसांना न जुमनता कोयता गँगने दुसऱ्या गटातील तरूणावर कोयत्याने वार केले. दोन गटात झालेल्या गँगवॉरमुळे स्थानिकामध्ये दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने डोके वर काढले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.