Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! परस्पर बचत गटाचे पैसे उचलल्याच्या कारणावरून पत्नीचा केला खून



परस्पर बचत गटाचे पैसे उचलले, या कारणास्तव पत्नीचा खून करून मृतदेह पिंपळनेर (ता. माढा) येथील वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची घटना घडली आहे.
बुधवार, दि. २७ डिसेंबर रोजी याबाबत फिर्याद विजय विठ्ठल गायकवाड (वय ३१, रा.
कुसळंब, ता. बार्शी, जि. सोलापूर) याने दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२२ डिसेंबर रोजी मृत संगीता नवनाथ डमरे (रा. आगळगाव, ता. बार्शी) हिला परस्पर बचत गटाचे पैसे का उचलले व घरातील पैसे का खर्च केले,
या कारणावरून फिर्यादीचा दाजी नवनाथ ज्ञानोबा डमरे याने त्याचा मित्र धनु वैजनाथ उकरंडे (दोघे रा.आगळगाव, ता.बार्शी) याच्या मदतीने कोठेतरी गळा दाबून मारहाण करून जीवे ठार मारून प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी

प्रेत पिंपळनेर (ता. माढा) येथील कॅनॉलमध्ये फेकून दिल्याने दोन्ही संशयीतावर दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे.

दि. २२ रोजी मृत संगीता नवनाथ डमरे हिने ती आढेगांव (ता.पंढरपूर) येथे आली असल्याचा फोन भावजीस केला होता.

ती मिळून न आल्याने नातेवाईक यांच्याकडे तपास केला होता. मात्र, ती मिळून आली नाही, असे फिर्यादीत नमूद आहे. अधिक तपास पोसई नाळे हे करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.