Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नैसर्गीक शेती ही काळाची गरज – शैलजा पाटीलकृषि विज्ञान केंद्र, कांचनपूर येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षणाचे आयोजन



नैसर्गीक शेती ही काळाची गरज – शैलजा पाटील
कृषि विज्ञान केंद्र, कांचनपूर येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षणाचे आयोजन


सांगली – 

शेतीवरील भांडवली खर्च कमी करून गुणवत्तापूर्वक शेती उत्पादनाला प्रोत्साहनासाठी राज्य शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची स्थापना केली. याव्दारे नैसर्गिक शेतीचा प्रचार प्रसिद्धी व त्यातील शेतीमाल वितरणासाठी एक स्वतंत्र व्यवस्था निर्माण होईल. सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून मानवी आरोग्यास लाभदायक आहे. आत्ताचे अन्नधान्य हे विषविरहित मिळणे अवघड बनले आहे. त्यासाठी सेंद्रिय भाजीपाला व धान्य पिकवण्याची आव्हाने आहेत. सर्व शेतकऱ्यांनी कुटुंबापुरती परसबाग करावी असे आवाहन संस्‍थेच्‍या अध्यक्षा श्रीमती शैलाजाभाभी पाटील यांनी केले. 

सांगली जिल्हातील गांव स्तरातील गट प्रमुखांचे २ दिवसीय प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र, कांचनपूर येथे चालू होते. हे प्रशिक्षण प्रकल्प संचालक आत्मा, सांगली व कृषि विज्ञान केंद्र, कांचनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले होते .

प्रशिक्षणाच्या उद्घाटनाच्या वेळी वसंत-प्रकाश विकास प्रतिष्ठान संचलित कृषि विज्ञान केंद्राच्या, अध्यक्षा श्रीमती शैलजाभाभी पाटील, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना, सांगलीचे अध्यक्ष मा. श्री. विशालदादा पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक, श्री. जांबुवंत घोडके, उपसंचालक श्री. राजाराम खरात, कृष्णाखोरे उत्पादक कंपनी, सावळजचे अध्यक्ष श्री. संजय पाटील, होनाई शेतकरी उत्पादक गट, हातनूरचे अध्यक्ष श्री. अजय पाटील तसेच कृषि विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. एस.एस. भूटे, कृषि पर्यवेक्षक श्री. आर.जे.पाटील, कृषि सहाय्यक श्री. तांदळे, श्री. मोरे, कु. चव्हाण, श्रीमती वेळापुरे व कृषि विज्ञान केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

तालुका स्तरीय सेंद्रिय शेती प्रशिक्षणासाठी तालुक्यातील गट प्रमुख व सर्व सभासद यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक १८ डिसेंबर रोजी पासून ते २८ डिसेंबर पर्यंत पुर्ण झाले. यामध्ये तासगांव, मिरज, जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी असे विविध तालुक्यातील शेतकरी प्रशिक्षणासाठी हजेरी लावली.

आत्मा विभागाचे प्रकल्प संचालक, श्री. जांबुवंत घोडके यांनी आपल्या भाषणात नैसर्गिक शेतीचे महत्व पटवून दिले. त्याचबरोबर सेंद्रिय शेती सुद्धा कशी आवश्यक आहे हेही सांगितले. अशाप्रकारे जर प्रत्येक शेतकऱ्याने शेती केली तर संपूर्ण भारत देश रोगमुक्त निश्चितच होईल व आपले नैसर्गिक शेती मिशन पूर्ण होण्यास मदत होईल. या प्रशिक्षणाचे आयोजन महाराष्ट्र राज्यात सांगली जिल्हात सर्व प्रथम आत्मा व कृषि विज्ञान केंद्र, कांचनपूर यांनी संयुक्तरीत्या यशस्वीपणे केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.