Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

थर्टीफर्स्टला या ठिकाणी मद्यसेवनाला जाऊ नये, नाहीतर होईल ही कारवाई.राज्य उत्पादन शुल्क विभागाचा इशारा



नवीन नर्षाच्या स्वागतासाठी मद्यपींकडून विविध रिसोटर्स, हॉटेल्स, हॉटेल्सवरील रुफ टॉप, ढाबे, क्लब, रहिवासी सोयायटींमधील क्लब या ठिकाणी कार्यक्रम, समारंभ, पाटर्यांचे विना परवानगी आयोजन केले जाईल त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे एक्साईज विभागाने सांगितले


मद्यविक्री परवाना नसलेल्या रिसोटर्स, हॉटेल्स, हॉटेल्सवरील रुफ टॉप, ढाबे, क्लब इ. ठिकाणी मद्यसेवन करण्यास ग्राहकांनी जाऊ नये तसे आढळून आल्यास त्यांचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम ६८ व ८४ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. सदर कारवाई अंतर्गत तीन वर्षापर्यंत कारावासची शिक्षा तसेच ५ हजार पर्यंत दंड आकारण्याबाबत तरतुद आहे.

रिसोटर्स, हॉटेल्स, हॉटेल्सवरील रुफ टॉप, ढाबे, क्लब, रहिवासी सोयायटींमधील क्लब यांना विना परवानगी पार्त्यांचे आयोजन करण्यात येवू नये याबाबत फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४९ अन्वये नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अनुज्ञप्तीधारकांना मद्यसेवन परवान्यावर मद्याची विक्री करणे बंधनकारक आहे त्यामुळे त्यांनी मद्यसेवन परवान्यावर मद्याची विक्री करावी.

या विभागाकडून अशा विशेष कार्यक्रमासाठी अनुज्ञप्ती (देण्यात येते. तरी ज्यांना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रम / समारंभ / पाटर्यांचे आयोजन करावयाचे आहे त्यांनी या विभागाकडे ऑनलाईन विनंती अर्ज करुन प्राप्त करुन घ्यावे. अनुज्ञप्तीमधून बनावट / अवैध मद्याची विक्री होत असल्याचे तसेच अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक या संदर्भात तक्रार करावयाची असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३९९९९, व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३/८४५९७४९२६६ तसेच दूरध्वनी क्रमांक ०२५३/२३१९७४४ वर संपर्क साधावा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.