जरांगे पाटलांच्या सभेत चोरट्यांचा सुळसुळाट; १ कोटींचा ऐवज पळवला
जालना : शहरात १ डिसेंबर रोजी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सभा व रॅली झाली. या रॅलीसह सभेला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात सोनसाखळ्या, मोबाइलसह पाकिटे, पर्स, रोख रक्कम लंपास केली आहे.
चोरट्यांनी ५० सोनसाखळ्या, रोख रक्कम, ९० मोबाइल, दुचाकी वाहने असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
काही ठिकाणी चोरटे व्हिडीओमध्ये कैद झाले आहेत. त्याचे व्हिडीओही पोलिसांकडे देण्यात आले आहेत. या चोरट्यांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी मराठा समाजबांधवांच्या वतीने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन चेन, मोबाइल, पाकीट, पर्स चोरून नेल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. याबाबत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. पोलिस ठाण्याला पथक नियुक्त करून चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.