Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुशासन दिवस श्रद्धेय श्री अटल जी जयंती साजरी

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुशासन दिवस श्रद्धेय श्री अटल जी जयंती साजरी 


 अटलजींची शिकवण : श्री. प्रकाश तात्या बिरजे   सोमवार २५ डिसेंबर २०२३: या भारत देशात सरकारे येतील आणि जातील एका पक्षाऐवजी दुसरा पक्ष सत्तेत येईल. पण या देशाचे वैभव पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्येक पक्षाने प्रयत्न करावयास हवे. कारण पक्षापेक्षा देश मोठा आहे. अशी शिकवण श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी आपणास दिली आहे. फक्त एक मताने भाजपाचे सरकार पडल्यावर संसदेत केलेल्या आपल्या अजरामर भाषणात अटलजीनी हि भावना व्यक्त केली. आपण सर्व कार्यकर्त्यांनी हि भावना मनात ठेवून भारत मातेची सेवा केली पाहिजे. असे विचार भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य श्री. प्रकाश तात्या बिरजे यांनी व्यक्त केले.आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 


भाजपा अटलजींचा वाढदिवस हा सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वच्छ आणि विकासाभिमुख प्रशासन हि अटलजींची विशिष्ठ ओळख होती. त्यानुसार आमदार गाडगीळ कार्यालयात पूर्व पंतप्रधान पूज्य अटलजींची प्रतिमापूजन करून जयंती साजरी करण्यात आली. 

याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि हिंदुस्थान ऑरोनेटीक्सचे संचालक दीपक बाबा शिंदे, श्रीकांत शिंदे, डॉ. भालचंद्र साठे, माधुरी वसगडेकर, प्रीती काळे, अमोल गवळी, सुनील भोसले, प्रियानंद कांबळे, गणपती साळुंखे, प्रदीप कार्वेकर, उदय मुळे, आबा जाधव, श्रीधर जाधव, गौस पठाण, सुजित काटे अमोल पाटील,  शांतीनाथ कर्वे, प्रशांत गौडाजी  इ. पदाधिकारी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.