Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

येरवडा कारागृहात महेश चंदनशिवे याचा खून


पुणे - येरवडा कारागृहात महेश चंदनशिवे या कैद्याचा खून झाल्याची घटना घडली आहे. दहा ते बारा जणांनी मारहाण केली होती. उपचारासाठी चंदनशिवे याला ससून रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

महेश चंदनशिवे 2014च्या खून प्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. 2014मध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात सात रिक्षाचालकांनी एका रिक्षा चालकावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला होता. पिंपरीतील डिलक्स चौक येथे रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. राजेश राजू जाधव (28, रा. डिलक्स टॉकीजजवळ, पिंपरी) असे खून झालेल्याचे नाव होते.

याबाबत त्यांच्या पत्नीने फिर्याद दिली होती. त्यानुसार महेश चंदनशिवे यासह इतर काही जणांवर गुन्हा दाखल झाला होता. चंदनशीवे दोषी आढळल्यानंतर त्याला शिक्षा सुनावली होती. तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. माहिती अपडेट होत आहे…

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.