Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; वसंतदादा कारखान्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; वसंतदादा कारखान्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न


सागंली : सांगलीत ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी थेट वसंतदादा कारखान्याला धडक दिली. आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न पोलीसांनी रोखला. यावेळी कार्यकर्ते व पोलीसांमध्ये झटापट झाली. या ठिकाणी राजू शेट्टीचे नेतृत्वाखाली आता काटाबंदी आंदोलन करण्यात येणार आहे. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सांगतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यावर काटाबंद आंदोलनासाठी एकत्र आले आहेत होते. सरकारच्या धोरणांविरोधात कारखान्याच्या मुख्य गेटवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर त्यांनी कारखान्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या आंदोलकांना गेटवरच थांबवले, त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिसांच्यामध्ये झटापटीचा प्रकारदेखील घडला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.