Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदींची लाट कायम, राहुल गांधींची भारत जोडो फेल

मोदींची लाट कायम, राहुल गांधींची भारत जोडो फेल


मध्य प्रदेश, राजस्थान,तेलंगणा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेले कल पाहत 4 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मोदींची लाट आणि अमित शहा यांची चाणक्यनिती पुन्हा एकदा भाजपच्या कामी आली आहे. भाजपने तिन्ही राज्यात इंडिया आघाडीचा धुव्वा उडवला आहे.

लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच

राज्यांच्या निवडणुकीचे कल आता समोर येत आहे. काँग्रेसची राजस्थानमध्ये सत्ता आहे, पण तिथे भाजपने बहुमतापेक्षा जास्त जागा घेऊन आघाडी घेतली आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसला धक्का बसला आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या 'लाडली बहना' योजना फायदेशीर ठरली आहे. मागील निवडणुकीत भाजप पराभूत झालं होतं, पण यावेळी भाजपला भरभरून मतदान मिळालं आहे. भाजपने सर्वाधिक जागा घेऊन सत्ता स्थापन करणार असं चित्र आहे. तर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. पण मतमोजणीमध्ये सकाळपासून आघाडीवर असलेल्या काँग्रेसला आता भाजपने मागे टाकलं आहे. त्यामुळे भाजपने काँग्रेसच्या हातातून 2 राज्य हिसकावून घेणार असं चित्र आहे.

या तिन्ही राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जोरदार प्रचार केला होता. खास करून मध्य प्रदेशमध्ये अमित शहा यांनी जातीने लक्ष घातलं होतं. अमित शहा मध्य प्रदेशमध्ये तळ ठोकून होते. तर पंतप्रधान मोदी यांनी पाचही राज्यांमध्ये प्रचारात सभांचा धुरळा उडवून दिला होता.

विशेष म्हणजे, आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात इंडिया आघाडीने मैदानात उतरण्याचा चंग बांधला आहे. पण, सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या पदरी अपयश येताना दिसत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी आणि शहा यांना आव्हान देणे हे इंडिया आघाडीला चांगलेच महागात पडणार, असंच या निकालावरून दिसून येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.