Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दरोड्यातील तिसऱ्या संशयितास बिहारमधून अटक सांगली एलसीबीची कारवाई; रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरण

दरोड्यातील तिसऱ्या संशयितास बिहारमधून अटक सांगली एलसीबीची कारवाई; रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरण


सांगलीतील मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स या सराफी दुकानावरील दरोड्यातील तिसऱ्या संशयितास बिहार येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून अन्य संशयितांची माहिती मिळवण्याचे काम सुरू असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतौश शिंदे यांनी दिली.

मोहमद समशाद मोहमद मुख्तार (वय २३, रा. चेरीया बरीयारपूर, जि. बेगुसराय, बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या गुन्ह्यात यापूर्वी ओडीसा येथील बरगड येथून अंकुरप्रताप सिंग (वय २५) याला या गुन्ह्यात पहिल्यांदा अटक करण्यात आली. त्यानंत्र या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सुबोध सिंग याला पाटणा येथील कारागृहातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. दि. ४ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिस असल्याची बतावणी करून आठ ते नऊ जणांच्या टोळीने पिस्तूलाचा धाक दाखवून रिलायन्स ज्वेल्स येथील ग्राहक आणि कामगारांचे हात-पाय बांधून सुमारे सहा कोटींचे हिऱ्याचे, सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल असा ऐवज लंपास केला होता. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबारही केला होता.

दरोडा टाकल्यानंतर संशयितांनी सफारी (क्र. एमएच ०४ ईटी ८८९४) या गाडीसह दुचाकीवरून पलायन केले होते. हा गुन्हा घडल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी याचा तातडीने तपास करून संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर एलसीबी तसेच विश्रामबाग पोलिसांची पथके बिहार, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिसा राज्यात तपासासाठी पाठवली होती. त्यानंतर विविध राज्यात पथकांनी पन्नास अधिक दिवस मुक्काम करत ओडिसा येथून अंकुरप्रताप सिंग याला अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर अन्य संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर सुबोध सिंग याला अटक करण्यात आली. आता समशाद मुख्तार याला अटक करण्यात आली आहे.

मुख्तार याने २०२१ मध्ये एका जिम ट्रेनरवर गोळीबार केला हौता. या बहुचर्चित प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वीच तो या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर सांगलीच्या एलसीबीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली.

सांगलीचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार्, उपनिरीक्षक कुमार पाटील, अकिब काझी, बिरोबा नळे, संदीप गुरव, सागर लवटे, शिवाजी सिद, अमर नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.