Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा खेळ संपला? विष देऊन मारण्याचा प्रयत्न

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा खेळ संपला? विष देऊन मारण्याचा प्रयत्न 


भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आहे. X (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर  ट्रेंड होत आहे. दाऊदच्या प्रकृतीबाबत चर्चेला उधाण आले असून पाकिस्तानातील इंटरनेट सेवा बंद पडल्याने चर्चेत भर पडली आहे. दाऊदसंदर्भात सरकारी यंत्रणाकडून अद्याप दुजोरा किंवा प्रतिक्रिया आलेली नाही.

सोशल मीडियावर रविवारी रात्री  ट्रेंडिगमध्ये आले. सोशल मीडियावर काही युजर्स असा दावा करत आहे की दाऊद इब्राहिमवर अज्ञात व्यक्तींनी विषप्रयोग केला आणि दाऊदवर सध्या कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उजव्या विचारधारेच्या युजर्सनी पाकिस्तानातून मोठी बातमी अशा आशयाची पोस्ट केल्याने चर्चेला जोर आला. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर, दिल्लीतील काही पत्रकारांनीही सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट टाकल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. रात्री उशिरापर्यंत पाकिस्तानातील माध्यमे, सरकारी यंत्रणा यांच्याकडून या वृत्ताबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही.

काही युजर्सनी पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांनी X वर पोस्ट केल्याचे स्क्रीनशॉट देखील व्हायरल केले. मात्र, काकर यांच्या X account वर गेल्या 24 तासात एकही पोस्ट टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे हे स्क्रीनशॉट खोटे असल्याचे स्पष्ट झाले.

पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रविवारी रात्री बऱ्याचशा शहरांमधील इंटरनेट डाऊन झाले. डाऊन डिटेक्टरवरील माहितीनुसार संध्याकाळी ७ नंतर कराची, लाहोर, रावळपिंडी येथील इंटरनेट डाऊन झाले. यामागे दाऊद इब्राहिम हे कारण असल्याची शक्यता भारतीय युजर्स वर्तवत आहेत. मात्र, पाकिस्तानात इंटरनेट डाऊन होण्यामागे राजकीय कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ऑनलाईन रॅलीमुळे सरकारने इंटरनेट बद केल्याचे आरोप पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षातर्फे केला जात आहे. भारतातील सुरक्षा यंत्रणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप दाऊद इब्राहिमबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सध्या तरी सोशल मीडियावर चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे दिसते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.