Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खासगी शिक्षण संस्थांच्या इमारतीवरील करमाफी व वीज पाणी बिले सवलतीचा सुधारीत शासन निर्णय होण्यासाठी यड्रावकर लक्ष घालणार.. रावसाहेब पाटील

खासगी शिक्षण संस्थांच्या इमारतीवरील करमाफी व वीज पाणी बिले सवलतीचा सुधारीत शासन निर्णय होण्यासाठी यड्रावकर लक्ष घालणार.. रावसाहेब पाटील


खासगी शिक्षण संस्थांच्या इमारतीवरील करमाफी व वीज पाणी बिले सवलतीचा सुधारीत शासन निर्णय होण्यासाठी यड्रावकर लक्ष घालणार.. रावसाहेब पाटील 

सांगली दि.२२: महाराष्ट्रातील खासगी शिक्षण संस्थांच्या इमारतीवरील करमाफी व वीज पाणी बिले सवलतीचा सुधारीत शासन निर्णय होण्यासाठी तातडीने मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत उर्जा, ग्रामविकास,नगरविकास व पाणीपुरवठा मंत्री यांची बैठक घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित खात्याचे सुधारित निर्णय पारीत करण्यासाठी लक्ष घालणार असे माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आश्वस्त केल्याचे महामंडळ कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सांगितले.

राज्यातील खासगी शिक्षण संस्थांच्या इमारतीवरील करमाफीचा निर्णय शासनाने वीस वर्षांपूर्वीच घेतला आहे. मे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही धार्मिक व शैक्षणिक संस्थांचे काम हे धर्मादाय तत्वावर चालते त्यामुळे अशा संस्थांच्या इमारतीवर कर घेता येणार नाही असे निकाल दिले आहेत. त्याची राज्यभर अंमलबजावणी होत नाही. शिवाय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने यापूर्वी शैक्षणिक संस्थांना निवासी दराने वीज पुरवठा करणेबाबत दरनिश्चित करुनही त्याप्रमाणे वीज बील आकारणी होत नाही. शिवाय बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शाळेसाठी होणारा पाणीपुरवठाही निवासी दरानेच झाला पाहिजे. 

या तिन्ही प्रश्नांवर ग्रामविकास, ऊर्जा व पाणीपुरवठा खात्यांचे सुधारीत शासन निर्णय होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील, महामंडळाचे कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे व कोल्हापूर विभागीय संघटक विनोद पाटोळे यांनी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवेदन दिले. शिक्षण संस्थांचे हे प्रश्न सुटले तर शिक्षण संस्था व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल त्यामुळे मी जातीने लक्ष घालून न्याय मिळवून देईन असे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. शिक्षण संस्था महामंडळाचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवेदन देताना रावसाहेब पाटील, प्रा. एन.डी.बिरनाळे व विनोद पाटोळे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.