Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विमानाच्या पंखात मेलेली कोंबडी का फेकली जाते?



मुंबई : एखादं मशीन बनवण्यासाठी त्याला अनेक चाचण्यांमधून पार पडावं लागतं. त्यात जर ते विमान असेल, तर त्याची निर्मिती करणं काही सोपं काम नाही. कारण सतत अनेक प्रवासी वाहून नेण्यासाठी त्या विमानाने तितकं सक्षम असायला हवं.

विमानाच्या निर्मितीत छोटीशी चूकदेखील महागात पडू शकते व अनेकांचे जीव जाऊ शकतात. विमानाचं इंजिन खूप शक्तिशाली असतं. ते योग्य पद्धतीनं तयार झालंय का याची चाचणी कशी घेतली जात असेल असं तुम्हाला वाटतं? आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा पद्धतीनं म्हणजे पंखामध्ये चिकन फेकून ही चाचणी केली जाते. जाणून घेऊ या त्यामागचं कारण.
आपल्याकडे एखाद्या उत्पादनाची चाचणी घेण्याच्या पद्धती ठरलेल्या असतात. ती वस्तू ठरवलेल्या निकषांनुसार तयार झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्या चाचण्या असतात. त्यानुसार विमानाचं इंजिन योग्य पद्धतीनं तयार झालं आहे की नाही, हे ठरवण्यासाठीही एक चाचणी घेतली जाते; मात्र ही चाचणी कोणती असते हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. अनेकांना त्यावर विश्वासही बसणार नाही; पण खरोखरच विमानाच्या इंजिनाची चाचणी घेण्याकरिता विमानाच्या पंखावर कोंबडी फेकली जाते. वरवर हे बाळबोध वाटलं, तरी यामागे काही कारण आहे.
काही वेळा आपण विमानाच्या पंखाला एखादा पक्षी धडकल्याचं ऐकतो. अशा वेळी विमानाचे पंखे आणि इंजिन यावर काय परिणाम होतो हे तपासण्यासाठी विमानाच्या पंख्यावर चिकन फेकून त्याची चाचणी घेतली जाते. द सनच्या एका रिपोर्टनुसार, कोणत्याही विमानावर एखाद्या पक्ष्यानं हल्ला केला किंवा तो धडकला, तर काय परिणाम होऊ शकतात, हे तपासण्यासाठी अशी चाचणी केली जाते व ती आवश्यकच असते, असं ब्रिटिश एअरलाइम पायलट असोसिएशननं सांगितलं होतं.

ही चाचणी खास पद्धतीच्या बर्ड गन किंवा बर्ड कॅननच्या मदतीनं केली जाते. त्याला चिकन गन असंही म्हटलं जातं. यात खूप साऱ्या मेलेल्या कोंबड्या असतात. गनच्या मदतीने त्या विमानाच्या इंजिनात फेकल्या जातात. विमानाचं इंजिन पक्षी धडकण्याचा धक्का सहन करण्यास सक्षम आहे की नाही, हे पाहिलं जातं. विंड शील्ड आणि इंजिन दोन्हींची अशा प्रकारे चाचणी घेतली जाते. साधारणपणे 2 ते 4 किलोंपर्यंतच्या कोंबड्यांना विंड शील्डमध्ये फेकलं जातं. टेकऑफ थ्रस्ट वेळेच्या दरम्यान हे केलं जातं. ही सामान्य पद्धतीची चाचणी असून टेकऑफच्या आधीच ती पार पाडली जाते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.