Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

२२ जानेवारीला घराघरात दीपावली! मोदींनी केलं भारतीयांना आवाहन


 जानेवारीला घराघरात दीपावली! मोदींनी केलं भारतीयांना आवाहन 


आयोध्या : येत्या 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची जगाला प्रतिक्षा आहे. अयोध्यातील जनतेचा उत्साह स्वाभाविक आहे. 22 जानेवारी रोजी देशभर दिवाळी साजरी करा. घरा घरात दिवे लावून घर उजळून टाका.
असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केलं. वंदे भारत आणि अमृत भारत या एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर मोदींनी भारतीयांना आवाहन केलं. मोदी यांनी यावेळी सियावर राम चंद्र की जय च्या तीनवेळा घोषणाही दिल्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "एककाळ होता. याच अयोध्येत रामलल्ला तंबूत विराजमान होते. आज रामलल्लाला पक्कं घर मिळालं. केवळ रामलल्लालाच नव्हे तर देशातील चार कोटी गरीबांना घर मिळालं आहे. जगातील कोणत्याही देशाला विकासाची उंची गाठायची असेल तर त्यांना आपला वारसा जपलाच पाहिजे. मी भारताच्या मातीतील कणाकणाचा आणि जनसामान्यांचा पुजारी आहे. मीही तुमच्या सारखाच 22 तारखेची वाट पाहत आहे. मीही रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आतूर झालो आहे. आपल्या सर्वांचा उत्साह मला अयोध्येच्या रस्त्यावर दिसून येत आहे. संपूर्ण जगच अयोध्येत आवतरलं की काय असं वाटतंय. तुम्ही जे प्रेम दाखवलं आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो." 

"माझ्यासाठी 30 डिसेंबरची तारीखही ऐतिहासिक आहे. कारण 1940 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानात झेंडा फडकवून भारताचा जयघोष केला होता. स्वातंत्र्याच्या पवित्र काळापासून आपण अमृत काळापर्यंत आलो आहोत. अयोध्येत नवी ऊर्जा मिळत आहे. 15 हजार कोटीहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात येत आहे. भूमीपूजन झालं आहे. त्रिकालदर्शी महर्षी वाल्मिकी यांच्या नावाने विमानतळ उभारण्यात आलं आहे. त्यामुळे या विमानतळावर आलेल्या प्रत्येक प्रवाशाला कृतज्ञ झाल्यासारखं वाटेल. महर्षि वाल्मिकी यांनी रचलेलं रामायण हे ज्ञानाचा मार्ग आहे. हा ज्ञानाचा मार्ग आपल्याला प्रभू श्री रामाशी नेऊन जोडतो. आधुनिक भारतात महर्षि वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि अयोध्या धाम आपल्याला भव्यदिव्य राम मंदिराशी कनेक्ट करेल." असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.