Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्थलांतरित पक्ष्यांची शिकार केल्याप्रकरणी कानपूरमध्ये दोघांना अटक, पहा व्हिडिओ

स्थलांतरित पक्ष्यांची शिकार केल्याप्रकरणी कानपूरमध्ये दोघांना अटक, पहा व्हिडिओ

उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांनी स्थलांतरित सायबेरियन पक्ष्यांची शिकार केल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात आरोपी सायबेरियन पक्षांना  घेऊन जाताना दिसत आहेत. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये 10 हून अधिक प्रजातींचे पक्षी दाखल झाले आहेत. उपनगरांमध्ये विशेषतः गंगा नदीच्या आसपास ते फिरत आहेत. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा मोठ्या प्रमाणावर पक्षी दाखल झाले आहेत. सरसौल वन परिक्षेत्राचे प्रभारी के. कुशवाह यांनी सांगितले की, चार जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून त्यापैकी दोन अल्पवयीन आहेत. महाराजपूर पोलिसांनी वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या कलम 9 आणि 21 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


कुशवाह यांनी सांगितलं की, व्हिडिओच्या माध्यमातून चौघांची ओळख पटली असून इतरांचीही ओळख पटवली जात आहे. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये स्थलांतरित पक्ष्यांची, विशेषत: सायबेरियन क्रेनची मोठ्या प्रमाणावर शिकार करण्यात आली आहे.

स्थलांतरित पक्ष्यांची हत्या करणाऱ्या दोघांना अटक -

वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, आमच्या तपासात असे दिसून आले की व्हिडिओ डोमनपूर पुर्वामीर, सरसौल येथे नदीजवळ शूट करण्यात आला होता. मृत पक्ष्यांना मारल्यानंतर त्यांना घेऊन जाताना दिसणारे लोक रामपाल आणि विनोद हे दिबियापूर गावचे रहिवासी आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू असून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.