Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पेरू देतो म्हणून घरात घेऊन गेला...पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार

पेरू देतो म्हणून घरात घेऊन गेला...पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार 


छत्रपती संभाजीनगर  जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर अत्याचार  केल्या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. पैठण तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. सदर घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पैठण पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच भागात अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना ही घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बाळू ज्ञानोबा जाधव असे या नराधमाचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, पहिलीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी दुपारी शाळेतून घरी जात होती. यावेळी रस्त्यात या मुलीला अडवून बाळू ज्ञानोबा जाधव याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यामुळे, पीडित मुलीच्या आईने पैठण पोलीस ठाणे गाठून या अत्याचार प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळास भेट देऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिसांचा पथक त्याचा शोध घेत आहे. 

यापूर्वी दोन वेळा त्याने मुलीची छेड काढली

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा विवाहित असून, त्याला एक मुलगा आहे. आरोपी हा पिडीत मुलीच्या घराजवळ राहत असून, गावात यापूर्वी दोन वेळा त्याने मुलीची छेड काढली होती अशीही चर्चा आहे. मात्र, गावातील प्रकरण असल्याने ग्रामस्थांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवले होते. परंतु, आता त्याने एका मुलीवर अत्याचार केल्याने गावात खळबळ उडाली आहे. तर, पोलिसांत गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे.

पेरू देतो म्हणून घरात घेऊन गेला...

पिडीत मुलगी मंगळवारी दुपारी शाळेतून घरी जेवण्यासाठी आपल्या चुलतभावाबरोबर चालली होती. यावेळी आरोपी बाळू जाधव याने सदर मुलीला तुला पेरू देतो, असे म्हणून त्याच्या घरात नेले व दरवाजा बंद करून त्याने सदर मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तो फरार झाला. घाबरलेल्या पीडित मुलीने दोन दिवसांनंतर ही बाब आपल्या आई, वडिलांना सांगितली. त्यानंतर आरोपी बाळू ज्ञानोबा जाधव विरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार याकलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैठण पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.