Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारूनंतर औषध घोटाळा? केजरीवाल आणखी एका प्रकरणात अडकले

दारूनंतर औषध घोटाळा? केजरीवाल आणखी एका प्रकरणात अडकले


अरविंद केजरीवाल सरकारच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. मद्य धोरण घोटाळ्यात सध्या केजरीवाल सरकारमधील अनेक नेत्यांवर आरोप झाले असून काहींवर कारवाईही झाली आहे. केजरीवाल आणखी एका प्रकरणात अडकलेले दिसतात.

दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी सीबीआयला ड्रग (औषधे) घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी रुग्णालयांसाठीच्या औषधांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप नायब राज्यपालांनी केला आहे. अशा परिस्थितीत आधीच एका प्रकरणात अडकलेल्या दिल्ली सरकारसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांच्या खरेदीत काही अनियमितता आढळून आल्याचा आरोप नायब राज्यपालांनी केला आहे. यानंतर सीबीआयने तपासाचे आदेश दिले आहेत. शासकीय रुग्णालयात औषध खरेदीत अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षता विभागाने दिल्ली सरकारमध्ये औषधांच्या खरेदीबाबत अहवाल सादर केला होता. यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना पत्र लिहून चौकशी करण्यास सांगितले आहे.

'आप' सरकारचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल यांनाही अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, केजरीवाल यांनी या समन्सला दोनदा केराची टोपली दाखवली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.