Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रातील तरुण, नोवल डॉकमधील युवकाने पुरवली गोपणीय माहिती; पाकिस्तानी ललना च्या जाळ्यात

महाराष्ट्रातील तरुण, नोवल डॉकमधील युवकाने पुरवली गोपणीय माहिती; पाकिस्तानी ललना च्या जाळ्यात 


प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये अडकल्याच्या प्रकरणास काही माहिनेच झाले आहेत. त्याचवेळी पुन्हा एका भारतीय युवकास पाकिस्तानी ललनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. हा तरुण मुंबईत नोवल डॉकमध्ये कार्यरत आहे.
महाराष्ट्रातील रहिवाशी आहे. पाकिस्तानी मुलीच्या जाळ्यात येऊन त्याने संवेदनशील माहिती पुरवल्याचे स्पष्ट झाले. नेव्हीमध्ये ज्युनियर पदावर असणारा गौरव पाटील याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्याला अटक केली. गौरव पाकिस्तानी इंटेलिजन्स एजन्सी (आयएसआय) महिल्याच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा संशय आहे.

कसा आला गौरव महिलेच्या जाळ्यात

नोवल डॉक काम करणारा गौरव पाटील हा फेसबुकवर आरती शर्मा आणि आणखी एका तरुणीच्या संपर्कात आला. फेसबुकवर हे बनावट अकाउंट्स होते. या माध्यमातून गौरव पाटील याला अडकवण्यात आले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तो त्यांचा संपर्कात होता. पाकिस्तानी पीआयओ एजंट्सने गौरव पाटील याच्याकडून गोपणीय माहिती घेतली. एप्रिल, मे 2023 ते ऑक्टोबर 2023 या काळात फेसबुक व व्हॉटसअ‍ॅपवर चॅटींग त्यांचे सुरु झाले. गौरव त्यांना गोपनिय माहिती वेळोवेळी देऊ लागला. त्यासाठी ते एजंट गौरव याला पैसे देत होते.

गौरव जळगावचा, ठाण्यात राहत होता…

गौरव हा मुळचा जळगाव जिल्ह्यातील आहे. ठाण्यामध्ये तो वास्तव्यास आहे. फ्लॅटमध्ये तो एकटाच राहत आहे. पाकिस्तानी एजंट्सच्या तो संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसने गौरव पाटील याच्यावर नजर ठेवली. त्याच्यावरील संशय बळावताच त्याला अटक केली. पाकिस्तानी इंटेलिजन्सला गौरव पाटील याने काही शिप्सची माहिती दिल्याचे तपासात उघड झाले आहे. महाराष्ट्र एटीएसने गौरव पाटीलला अटक केली असून आणखी तिघांना आरोपी बनवण्यात आले आहे.

प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये

पुणे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाचे तत्कालीन संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे मे महिन्यात उघड झाले होते. प्रदीप कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात आहे. त्यांनी पाकिस्तानी गुप्तहेर असलेल्या महिलने व्हॉटसॲप आणि इमेलच्या माध्यमातून गोपणीय माहिती दिल्याचा आरोप आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.