Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धावत्या बसमध्ये चालकाचा तरुणीवर बलात्कार, आवाज बाहेर जाऊ नये म्हणून स्पीकरवर लावली गाणी

धावत्या बसमध्ये चालकाचा तरुणीवर बलात्कार, आवाज बाहेर जाऊ नये म्हणून स्पीकरवर लावली गाणी

चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसच्या चालकानेच तरुणीवर अतिप्रसंग केला आहे तर मुलीच्या ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून वाहकाने लाउड स्पीकरवर गाणी लावून ठेवली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, पीडीतेच्या तक्रारीवरुन बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयपुर येथील ही घटना असून तरुणी कानपूर येथून जयपुर येथे जात होती. या प्रकरणी पीडित तरुणीने 9 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या तक्रारीनुसार, बसच्या केबिनमध्ये ती बसलेली असताना ड्रायव्हरने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात कानोता ठाणे पोलिसांनी एफआयआर दाखल केली असून तपास करण्यात येत आहे.



काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता ती कानपूरहून जयपूरला जात होती. प्रायव्हेट बसमध्ये ती बसली होती. कानपुरहून बस रवाना झाल्यानंतर जवळपास अर्धा तासाने चालक तिच्याकडे येऊन बोलला की तुझ्या बाजूच्या सीटवर दारुडा मुलगा बसला आहे. तु केबिनमध्ये माझ्या बाजूला येऊन बस. ड्रायव्हरच्या सांगण्यावरुन ती केबिनमध्ये जाऊन बसली. तिथे आधीपासूनच तीन मुलं बसले होते. त्यामुळं ती ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसली. रात्री जवळपास 11 वाजता ती तिथेच झोपली होते. तेव्हा अचानक ड्रायव्हर तिच्याजवळ आला आणि तिच्यावर जबरदस्ती करु लागला.


तरुणीने आरडाओरडा सुरू केल्यानंतर कंडक्टरने बसमधील लाउड स्पीकर सुरू करुन त्यावर मोठ्या आवाजात गाणी लावली. जेणेकरुन तिचा आवाज बाहेर जाऊ नये. तरीदेखील तरुणीच्या आरडा-ओरड्यामुळं बसमधील इतर प्रवासी जागे झाले आणि आवाजाच्या दिशेने जात ड्रायव्हर व कंडक्टरला जाब विचारला. प्रवासी जागे झाल्याचे पाहताच कंडक्टर बसमधून उतरुन पळून गेला. तर प्रवाशांना ड्रायव्हरला पकडून त्याला बसमधून उतरवून चांगलाच चोप दिला. प्रवाशांनी बस चालकाला पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेनंतर पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीला अटक केले आहे तर, बस चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.