Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अक्षरशः आमदार तोंडावर आपटले, क्रिकेटच्या मैदानावर घडला प्रकार



: क्रिकेट हा भारतीयांसाठी एका प्रकारचा धर्म आहे असं म्हटलं जातं. १.४ अब्ज लोकसंख्येचा देश असलेल्या भारताला एकत्र आणणारा खेळ म्हणूनही क्रिकेटची ओळख आहे

देशात क्वचितच असा कोणी असेल ज्याने लहानपणापासून मोठं होत असताना क्रिकेट खेळला किंवा पाहिला नसेल. क्रिकेटची सवय आणि प्रेम असे आहे की जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा लोक दोन्ही हातांनी बॅट पकडतात आणि उंचच उंच शॉट्स भिरकवण्याचा प्रयत्न करतात. अगदी भररस्त्यात असो किंवा बिल्डिंगच्या आवारात असो अनेक क्रिकेटपटू तुम्हीही पाहिले असतील. कदाचित आपणही त्यातील एक असू शकता. मात्र, आता हीच आवड ओडिशातील एका आमदाराला महाग पडली आहे.

ओडिशाच्या नार्ला मतदारसंघाचे आमदार भूपेंद्र सिंह नुकतेच कालाहांडी येथे एका क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. तथापि, भूपेंद्रसिंग यांच्यातील फलंदाज खेळपट्टीकडे पाहून बॅट हातात घेण्यापासून थांबवू शकला नाही. तरुण मुले आणि चाहते पाहत असताना त्यांनी बॅट हातात घेत मैदानात प्रवेश घेतला. चेंडूला सामोरे जाण्यासाठी तयार असलेल्या आमदारांची रेकॉर्डिंग करताना एक मुलगा दिसत होता. गोलंदाजाने संथ शॉर्ट बॉल टाकताच आमदारांनी पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, उत्साहाने पायांची जास्त हालचाल करताना तोल न राहिल्याने आमदार अक्षरश: तोंडावर पडले.

या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आपण पाहू शकता की, आमदार बॉलवर वाइल्ड स्विंगसाठी बॅट घेऊन बाहेर पडले आणि काहीच क्षणात मैदानावर कोसळले.

नव्या माहितीनुसार, खाली पडल्यानंतर झालेल्या दुखापतींमुळे आमदारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मात्र यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यापेक्षा राजकारणातील बॅटिंग सोपी वाटत असेल ना, म्हणून ज्याचं काम त्याने करावं अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडीओखली पाहायला मिळत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.