Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जनतेला काहीही फुकट देऊ नका, इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे विधान

जनतेला काहीही फुकट देऊ नका, इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे विधान

देशातील जनतेला सरकारने काहीही फुकट देऊ नये, असे विधान इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी गुरुवारी केले. बंगळुरू येथील टेक समिट 2023 च्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मी मोफत सेवांच्या विरोधात नाही, परंतु जे लोक सरकारद्वारे प्रदान केलेल्या सेवा आणि अनुदानांचा लाभ घेतात त्या लोकांनी समाजाच्या भल्यासाठी योगदान दिले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.


पेंद्रातील मोदी सरकारने 'प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने'ला पाच वर्षांची मुदतवाढ दिलेली असतानाच नारायण मूर्ती यांनी देशातील जनतेला सरकारने काहीही फुकट देऊ नये, असे विधान केले आहे. पेंद्र सरकार या योजनेतून 81.35 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देणार आहे. पेंद्र सरकारच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी मूर्ती यांनी हे विधान केल्याने त्यांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. नारायण मूर्ती यांनी याआधी देशातील तरुणांनी आठवडय़ात कमीत कमी 70 तास काम करायला हवे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर सर्वच क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काहींनी समर्थन केले होते तर काहींनी मूर्ती यांच्या या विधानांवर आक्षेप घेतला होता.


3 शिफ्टमध्ये काम करा

मी आपल्या राजकीय नेत्यांना विनंती करेन की त्यांनी चीनचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. आपल्या लोकांची गरिबी कमी करणारा देश बनू शकेल. देशातील तरुणांना सुधारण्यासाठी अधिकाधिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा स्थापन करण्यासाठी, तीन शिफ्टमध्ये काम करण्यासाठी आणि चीनशी स्पर्धा करण्यासाठी त्वरित निर्णय घ्यायला हवा, असेही मूर्ती यावेळी म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.