Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखिलेश यादव यांनी भाजपवर केले गंभीर आरोप

अखिलेश यादव यांनी भाजपवर केले गंभीर आरोप

मध्यप्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. एकीकडे मतमोजणी सुरू असताना दुसरीकडे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आता समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आझम खान यांच्या अटकेप्रकरणी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने समाजवादी पक्षाचे आझम खान यांच्यावर खोटे आरोप केले असून आता मतांचे राजकारण करण्यासाठी त्यांना तुरुंगात पाठवल्याचे अखिलेश यादव म्हणाले.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी विधानसभेत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. हे मोठेमोठे प्रोजक्ट उभारले जात आहेत, मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर बोटे दाखवली जात आहेत, मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर अशा गोष्टी बोलल्या गेल्या तर भाजप नेत्यांवरही बोटे दाखवली जातील, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. तेही दुखावले जातील. त्यांनी असे काम करू नये. जर तुमचा नारा 'सबका साथ, सबका विकास' असेल तर कोणासोबतही भेदभाव होता कामा नये.


पुढे ते म्हणाले, आझम खान, त्यांची पत्नी ताजीन आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांनी वैयक्तिक फायद्यासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अब्दुल्ला यांचे जन्म प्रमाणपत्र बनवले. पहिले जन्मप्रमाणपत्र 28 जून, 2012 रोजी रामपूर नगरपालिकेत बनवण्यात आले. त्यामध्ये अब्दुल्ला यांचे जन्मस्थान रामपूर असल्याचे दाखवण्यात आले होते. तर 21 जानेवारी, 2015 रोजी लखनऊ महानगरपालिकेकडून दुसरे जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आले होते. दुसऱ्या प्रमाणपत्रात जन्म ठिकाण लखनऊ असल्याचे दाखवण्यात आले.


न्यायालयाने 2019 च्या बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात आझम खान यांना दोषी आणि त्यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. आझम खान यांच्या अटकेनंतर अखिलेश यादव आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.