Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रागाच्या भरात जावयानं पत्नी, सासरा अन् दोन मेहुण्यांना संपवलं!

रागाच्या भरात जावयानं पत्नी, सासरा अन् दोन मेहुण्यांना संपवलं!

यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर येथे मध्यरात्री मोठे हत्याकांड घडले आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशयाने जावयाने धारदार शस्त्राने वार करत पत्नी,दोन मेहुणे आणि सासऱ्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेत एकाच कुटुंबतील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून सासू गंभीर जखमी आहे. गोविंद विरचंद पवार असे आरोपी जावयाचे नाव आहे. पत्नी रेखा गोविंद पवार, सासरा पंडित घोसाळे, मेहुणा ज्ञानेश्वर भोसले आणि सुनील भोसले यांचा मृत्यू झावा आहे. या घटनेने यवतमाळ जिल्ह्याात मोठी खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्या येथे पत्नी राहत होती. चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये वाद होत असल्याची माहिती आहे. पत्नीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचा संशय गोविंद याला होता. त्यावरून पती-पत्नीत नेहमी वाद व्हायचे. या कारणावरून गोविंद पत्नी रेखाला नेहमी मारहाण करीत होता.त्यामुळे कंटाळून ती गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहत होती. याच कारणावरून गोविंदचे पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांसोबत सतत वाद सुरू होते. या वादातून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. तसेच, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सासू गंभीर जखमी

दरम्यान पती रात्री 11 च्या सुमारास पत्नीच्या माहेरी पोहचला. जावई पत्नीच्या घरी गेला आणि सासरच्या लोकांवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत पत्नी, मेहुणा, सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर जावयाच्या हल्ल्यात सासू रुखमा घोसले मध्यस्थी करत असताना गंभीर जखमी झाल्या आहेत. सासूला रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंकर कळंब पोलिसांनी आरोपी जावई गोविंद विरचंद पवार याला अटक केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.