Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुचाकी चोरणाऱ्या भेंडवडेच्या दोघांना सांगलीत अटक सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची कारवाई

दुचाकी चोरणाऱ्या भेंडवडेच्या दोघांना सांगलीत अटक सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची कारवाई

सांगली :  सांगली, आष्टा येथून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना सांगलीत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

अरमान अब्दुल नदाफ (वय १९, रा. प्रताप चौक, सांगली, मूळ रा. भेंडवडे, ता. हातकणंगले), धैयर्शील आनंदराव निकम (वय १९, रा. भेंडवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने त्याला आळा घालण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक निरीक्षक शिंदे यांनी तयार केले होते. या पथकाला दुचाकी चोरट्यांना अटक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. 

पथक सांगलीत गस्त घालत असताना रेल्वे स्थानकाजवळील सह्याद्रीनगर येथे दोघेजण विना क्रमांकाची दुचाकी घेऊन थांबल्याचे दिसले. पथकाने दोघांना ताब्यात घेतेल. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आष्टा तसेच सांगलीतून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीच्या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या. दोघांनाही संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, विक्रम खोत, संदीप नलवडे, उदय माळी, सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.