Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुचाकी चोरणारा अल्पवयीन ताब्यात, दोन गुन्हे उघडअडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

दुचाकी चोरणारा अल्पवयीन ताब्यात, दोन गुन्हे उघडअडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई


सांगली :  कवठेमहांकाळ तालुक्यात विविध ठिकाणी उभ्या केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून अडीच लाख रूपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहितील एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
 
कवठेमहांकाळ तालुक्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे चोरट्यांना पकडण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते. हे पथक कवठेमहांकाळ तालुक्यात गस्त घालत असताना चोरट्याने चोरलेल्या दुचाकी त्याच्या शेतातील गंजीजवळ लपवून ठेवल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. 

माहितीनुसार पथकाने आरेवाडी येथे छापा टाकला. त्यावेळी तेथे चोरीच्या दुचाकी आढळल्या. त्यानंतर त्या मुलाकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने कवठेमहांकाळ शहरातून एक, लोणारवाडी येथून एक बुलेट तर कर्नाटकातील खिळेगाव येथून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला ताब्यात घेऊन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, आमसिद्ध खोत, कुबेर खोत, दीपक गायकवाड, बाबासाहेब माने, अमर नरळे, अजय बेंद्रे, रोहन घस्ते, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.