Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सर्व धर्मांनी मिळून अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करावा : श्री. रावसाहेब पाटील

सर्व धर्मांनी मिळून अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करावा : श्री. रावसाहेब पाटील


सांगली : इतर समाज आपल्या हक्कांसाठी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी एकत्र येवून लढताना दिसत आहेत. यासाठी आपणही घटनेने दिलेल्या अधिकारासाठी समाजामध्ये जनजागृतीची आवश्यकता असून त्यासाठी सर्व धर्मांनी मिळून अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करावा, कारण प्रत्येक धर्म कोठे ना कोठे अल्पसंख्याक असतोच असे मत द.भा.जैन सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जि.पाटील यांनी व्यक्त केले. 

दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपल्या अल्पसंख्यांक हक्कांसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आपला समाज देशात अत्यंत अत्यल्प आहे, त्यासाठी आपली अधिकार कोणते आहेत याविषयी समाजामध्ये जनजागृतीची गरज आहे. अल्पसंख्याक हक्क दिनादिनी समाज मोठ्याप्रमाणात एकत्र येवून अल्पसंख्यांकबाबत चर्चासत्रे संपन्न व्हावीत असे सांगितले. तत्पूर्वी मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी अल्पसंख्याकासंबंधी घटनेतील तरतूदी, अल्पसंख्यांकाचे फायदे, त्याचबरोबर धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक याबाबत उपस्थितांना माहिती देवून समाजातील तरूण व्यावसायिक, विद्यार्थी यांच्यासाठी विविध योजना असून त्याचा लाभ घेण्यासाठी खूप जनजागृतीची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. घटनेने जैन, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन आणि ईसाई यांना अल्पसंख्यांकाचा दर्जा दिला आहे. मध्यंतरी सरकारने जैन धर्माला या यादीतून वगळले. दक्षिण भारत जैन सभेने पुन्हा लढा देवून हा दर्जा सुप्रिम कोर्टातून पुन्हा मिळविला.

सुरूवातीला भ. महावीरांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन झाले. अल्पसंख्याक लढ्यासंबंधी डॉ. चंद्रकांत चौगुले यांनी शिरपुरकर गुरूजी, क्षु. सुरेंद्रकीर्ति, पत्रकार बाळ पाटील, न्यायमूर्ती सी.टी.पाटील, बापूसाहेब बोरगावे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.  स्वागत व प्रास्ताविक केले. तर श्री. एन.जे.पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास ट्रस्टी शांतिनाथ नंदगावे, डॉ. देवपाल बरगाले, गजकुमार उपाध्ये,  अनिल बिरनाळे, बी.बी.शेंडगे, महावीर आडमुठे, सौ. कमल मिणचे,अनिता पाटील, छाया कुंभोजकर, अंजली कोले, सुनिता चौगुले, विजया कर्वे, मीना आरवाडे यांच्यासह दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल, पदवीधर संघटना, जैन महिला परिषद, कळंत्रे जैन श्राविकाश्रमासह परिसरातील बहुसंख्य श्रावक उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.