Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संल्लग्न शिराळा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय पाटील,उपाध्यक्षपदी बाजीराव घोडे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संल्लग्न शिराळा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय पाटील,उपाध्यक्षपदी बाजीराव घोडे.



सांगली : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सल्लग्न शिराळा तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी  राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय पाटील तर उपाध्यक्षपदी बाजीराव घोडे व ज्ञानदेव शिंदे व कार्याध्यक्षपदी सुमंत महाजन यांची निवड करण्यात आली.

सांगली  येथे संजय भोकरे ग्रुप आँफ इन्सिट्यूट  येथे निवडीचा कार्यक्रम पार पडला.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे  जेष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा.वैजनाथ महाजन,संचालक महमद मणेर, पत्रकार रविंद्र कदम,माजी अध्यक्ष भगवान शेवडे, यांची प्रमुख  उपस्थिती होती.

यावेळी बोलताना संघटक संजय भोकरे म्हणाले की शिराळ्या सारख्या डोंगरी व मागासलेल्या तालुक्यातील पत्रकारांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सदैव पाठीशी  उभा राहिल. आज पत्रकारांनी एकत्र असणे काळाची गरज आहे. राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून शिराळा  तालुक्यातील विविध प्रश्र्नांचा चर्चा  करून ते सोडवण्यासाठी संघटनेतील पत्रकारांना बळ दिले जाईल असे सांगितले. शिराळा तालुक्याला राजकीय व सामाजिक असा मोठा वारसा आहे.तो जपुन सामाजिक प्रश्र्नांची सोडवणुक करावी असे आवाहन संजय भोकरे यांनी केले.

यावेळी शिराळा तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करणेत आली.अध्यक्ष विजय पाटील,उपाध्यक्ष बाजीराव घोडे व  कार्याध्यक्ष सुमंत महाजन' सरचिटणीस सहदेव खोत, सचीव प्रकाश मोहरेकर,संघटक भरत गुंडगे,कायदेशिर सल्लागार अँड सुधीर पाटील , सदस्य सुभाष कदम, धनाजी आसवले, राजेंद्र दिवाण,अजित शिंदे,नथूराम कुंभार,गणेश माने, अश्पाक अत्तार,राजकुमार पाटील , शिवाजी पाटील,विलास नांगरे,बालेखान डांगे, सुरेश पवार,अमित कांबळे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या संल्लग्न शिराळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष  विजय पाटील,उपाध्यक्ष बाजीराव घोडे,सुमंत महाजन ,रविंद्र कदम यांचा सत्कार करताना संघटक संजय भोकरे, आदी मान्यवर...

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.