रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरु, मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचा 'या' राज्याचा मोठा नेता बंडाच्या तयारीत?
राजस्थानात भारतीय जनता पार्टीने विजय मिळवलाय. पण मुख्यमंत्री निवडण्यासाठी पक्षाला बरच मंथन कराव लागतय. दिल्लीपासून जयपूरपर्यंत बैठकांच सत्र सुरु आहे. वसुंधरा राजे स्वत: दिल्लीमध्ये आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्यासोबत त्यांची भेट होऊ शकते, अशी चर्चा आहे, वसुंधरा राजे राज्याच्या बाहेर आहेत, पण तिथे राज्यात दुसराच खेळ सुरु झाला आहे. आधी अशी माहिती आली की, भाजपाच्या 7 आमदारांना हॉटेलमध्ये थांबवून हायकमांडवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला.
आता या संदर्भात महत्त्वाची माहिती टीव्ही 9 भारतवर्षला मिळाली आहे. हॉटेलमध्ये थांबलेल्या 7 पैकी एक आमदार ललित मीणा आणि त्यांचे वडील हेमराज मीणा यांच्याशी TV9 ने चर्चा केली. वसुंधरा राजे आणि त्यांचे खासदार पुत्र दुष्यंत सिंह यांच्या सांगण्यावरुन आमदारांना हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं होतं, असं हेमराज मीणा यांनी सांगितलं. ललित मीणा यांच्या वडिलांना या बद्दल समजल्यानंतर त्यांनी पक्ष सरचिटणीस अरुण सिंह यांना ही गोष्ट सांगितली.
आमदारांना पक्ष कार्यालयात जाण्यापासून कोणी रोखलं?
TV9 शी बोलताना हेमराज मीणा यांनी सांगितलं की, वसुंधरा यांचे पुत्र दुष्यंत सिंह यांनी 7 आमदारांना सांगितलं होतं की, कोणीही पक्ष कार्यालयात जायच नाही. सगळे हॉटेलमध्येच थांबतील. 7 आमदारांना हॉटेलमध्ये थांबवणं, हे त्रासदायक आहे, असं हेमराज मीणा यांनी सागितलं. हे पक्ष विरोधी पाऊल आहे का? त्यावर हेमराज मीणा यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. “हे पक्षशिस्ती विरोधात आहे किंवा नाही, हे पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह सांगू शकतील” असं हेमराज वीणा म्हणाले.
भाजपाने किती जागा जिंकल्या?
3 डिसेंबरला राजस्थानात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपाला बहुमत मिळालं. भाजपाने 115 जागा जिंकल्या. काँग्रेसला 69 जागांवर समाधान मानाव लागलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.