Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रवास करताना रस्त्यात पेट्रोल किंवा डिझेल संपले तर नका घेऊ टेन्शन! या टोल फ्री नंबरवर करा कॉल आणि जागेवर मिळवा पेट्रोल

प्रवास करताना रस्त्यात पेट्रोल किंवा डिझेल संपले तर नका घेऊ टेन्शन! या टोल फ्री नंबरवर करा कॉल आणि जागेवर मिळवा पेट्रोल


बऱ्याचदा आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा रात्री- बेरात्री किंवा दिवसा देखील गाडीचे पेट्रोल किंवा डिझेल संपते. त्यामुळे रस्त्यात आपली तारांबळ उडते व खूप मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते. पेट्रोल पंप जवळ असेल तर ठीक नाहीतर खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

कधी कधी प्रवासादरम्यान काही अपघाताच्या घटना देखील घडू शकतात. आपल्याला माहित आहे की रस्त्यावर जर कधी अपघात झाला तर मदतीला देखील जास्त करून कोणी धावून येत नाही. अशा प्रसंगी आपल्याला काय करावे हे उमजत नाही. परंतु आता काळजी करण्याची गरज नसून जर अशा काही घटना प्रवासाच्या दरम्यान घडल्यात तर तुम्ही एका टोल फ्री नंबरवर कॉल करून उभ्या राहिलेल्या या समस्यांचे निराकरण करू शकतात.

अशापद्धतीनेआपत्कालीनपरिस्थितीतप्रवासकरताना मिळू शकते तुम्हाला मदत

आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण रस्त्याने प्रवास करतो तेव्हा रस्त्यांवर टोलनाके असतात व या टोलनाक्यांवर आपण टॅक्स म्हणून पैसे भरत असतो. हा टॅक्स आपण त्या रस्त्यावरून गाडी चालवतो म्हणून भरतो. परंतु या टॅक्स भरल्यामुळे आपल्याला काही सुविधा देखील या माध्यमातून मिळतात.

परंतु बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नसते. टोल टॅक्स भरल्यानंतर तुम्ही तो रस्त्याचा वापर तर करू शकतात परंतु कोणत्याही मेडिकल इमर्जन्सी मध्ये किंवा पानांमध्ये काही बिघाड झाला किंवा पेट्रोल, डिझेल संपले तर अशा प्रसंगी तुम्हाला मदत देखील मिळू शकते. याकरिता फक्त तुम्हाला देण्यात आलेल्या काही हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करणे गरजेचे असते. यातील महत्त्वाचे म्हणजे…

1.
पेट्रोलसंपलेतर– बऱ्याचदा आपण हायवेवरून प्रवास करत असताना अचानक पेट्रोल किंवा डिझेल संपते. दूर दूर पर्यंत आपल्याला पेट्रोल पंपाचा सुगावा लागत नाही व त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते. परंतु अशाप्रसंगी चिंता न करता तुमच्या टोल टॅक्स पावतीवर दिलेला जो काही हेल्पलाइन क्रमांक असतो त्यावर तुम्ही कॉल करणे गरजेचे आहे. त्यानंतर कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला काही प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेल दिले जाते किंवा पुरवले जाते. साहजिकच यामध्ये तुम्हाला पैसे द्यावे लागतात परंतु होणारी समस्या मिटते. याकरिता पेट्रोल हेल्पलाइन क्रमांक पाहिले तर 8577051000 आणि 7237999944 यावर तुम्ही कॉल करू शकता.

2.
वाहनामध्येबिघाड झाला तर– बऱ्याचदा प्रवास करत असताना दुचाकी असो किंवा कार यामध्ये काही बिघाड झाला तर समस्या निर्माण होऊ शकते. अशाप्रसंगी तुम्ही मेकॅनिक किंवा कार सेवेची देखील मदत घेऊ शकतात. याकरिता तुम्हाला 8577051000 आणि 7237999955 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकतात. त्यामध्ये मेकॅनिक येण्याची सुविधा ही फ्री मध्ये आहे. परंतु वाहनामध्ये काही समस्या निर्माण झाली असेल तर मेकॅनिक शुल्क आकारतो. जागेवर जर संबंधित वाहन दुरुस्त करता आले नाही तर ते सर्विस स्टेशनकडे देखील नेले जाते.

3.
मेडिकलइमर्जन्सीमध्ये– बऱ्याचदा प्रवास करत असताना रस्त्यातच कोणी आजारी पडते व अशावेळी आपल्याला काय करावे हे समजत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वेळ न घालवता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिकेला 8577051000 आणि 7237999911 या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून मोफत ॲम्बुलन्स मिळवू शकतात.

याशिवाय तुम्हाला रस्त्यावर कुठल्याही प्रकारची इतर समस्या आली तर तुम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 1033 किंवा 108 वर कॉल करू शकतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.