Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाचगणीत 'छमछम'वर पोलिसांचा छापा चार युवती, हॉटेल चालकासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा; सातारा, मिरजेतील डॉक्टरांचा समावेश

पाचगणीत 'छमछम'वर पोलिसांचा छापा चार युवती, हॉटेल चालकासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा; सातारा, मिरजेतील डॉक्टरांचा समावेश


पाचगणीतील स्प्रिंग रिसोर्टमधील 'छमछम'वर पोलिसांचा छापा चार युवती, हॉटेल चालकासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा; सातारा, मिरजेतील डॉक्टरांचा समावेश 

कुडाळ :  पाचगणीतील कासवंड येथील स्प्रिंग रिसोर्टवर 'छमछम' सुरू असतानाच सातारा पोलिसांनी छापा टाकला. यावेळी चार युवती, सातारा जिल्ह्यातील पाच, व मिरजमधील एक डॉक्टर, व पुण्याचा फार्मासिस्ट असे एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे सातारा, सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
डॉ. मनोज विलास सावंत (रा. दहिवडी), डॉ. राहुल बबनराव वाघमोडे (रा. दहिवडी) डॉ. निलेश नारायण सन्मुख (रा. मिरज), डॉ. रणजीत तात्यासो काळे (रा. दहिवडी), डॉ. महेश बाजीराव साळुंखे (रा. मलकापूर, कराड), डॉ. खाडे (रा. सातारा), डॉ. प्रवीण शांताराम सौद (रा. पुणे, फार्मासिस्ट) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पाचगणी कासवंड गावातीलच स्प्रिंग रिसॉर्ट नावाच्या ठिकाणी हॉटेलमधील एका हॉलमध्ये सांगली, पुण्यातून नर्तिका आणण्यात आल्या असून, त्या गिऱ्हाईकांसमोर तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नाचत असल्याची माहिती साताऱ्याच्या अपर पोलिस अधीक्षक आचल दलाल यांना मिळाली. त्यांनी साताऱ्यावरून विशेष पथक पाचगणी कासवंड येथे पाठवले. पथक घटनास्थळावर पोहोचताच रात्री साडेनऊच्या सुमारास पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्टच्या तळमजल्यावर सहा ते सात जण दारूच्या नशेत नर्तिकांच्या समोर झिंगत असतानाच रंगेहात पोलिसांना सापडले. पोलिसांनी कारवाई करत चार महिला त्यांच्यासमवेत नाचणाऱ्या सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट रिसॉर्ट चालक शिर्के नावाच्या व्यक्ती असे एकूण आठ जणांना ताब्यात घेतले. पाचगणी पोलीस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.