Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक सांगली शहर पोलिसांची आठ तासांच्या आत कारवाई

एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक सांगली शहर पोलिसांची आठ तासांच्या आत कारवाई

सांगली :  शहरातील वखारभागातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेचे एटीएम मशीन फोडून ते चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक करण्यात आली. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली होती. यातील संशयिताला केवळ आठ तासांच्या आत अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.

चेतन अशोक पुजारी (वय २५, रा. वाल्मिकी आवास योजना, जुना बुधगाव रस्ता, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास वखारभागातील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतील एटीएम फोडून ते चोरण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत गजानन कोळी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर निरीक्षक श्री. देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला यातील संशयिताला पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पथक संशयितांचा शोध घेत असताना एटीएम फोडणारा संशयित जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी आवास योजना परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने तेथे सापळा रचून पुजारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय एका ठिकाणी घरफोडी केल्याचीही कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, श्रीपाद शिंदे, सचिन शिंदे, संदीप कुंभार, योगेश सटाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.